IPL 2025 PBKS vs KKR 31st Match Player To Watch Glenn Maxwell Punjab Kings : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात प्रीती झिंटाच्या सह मालकीचा पंजाब किंग्ज संघ धमाकेदार कामगिरी करताना दिसतोय. या संघातून नवा कर्णधार श्रेयस अय्यरनं आपला तोरा दाखवला. अनकॅप्ड प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य या सलामी जोडीनंही जलवा दाखवला. पण या ताफ्यातील मॅचला कलाटणी देण्याची क्षमता असणाऱ्या खेळाडूची जादू काही अजून दिसलेली नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
क्रिकेटर अन् संघ मालकीण यांच्यात खास बॉन्डिंग
हा तोच क्रिकेटर आहे जो दुसऱ्यांदा पंजाब किंग्जच्या ताफ्याचा भाग झालाय. पंजाब संघाकडून पदार्पणाच्या हंगामात त्याने दमदार कामगिरी केली होती. त्याच्या धमाकेदार इनिंगसह संघाची सह मालकीण प्रीती झिंटासोबत त्याचे खास बॉन्डिंगही पाहायला मिळाले आहे. आता यंदाच्या हंगामात तो मैदानातील कामगिरीशिवाय संघ मालकीणीसोबत बिझनेस पार्टनरही झालाय. जाणून घेऊयात या क्रिकेटरची यंदाच्या हंगामातील कामगिरीसह त्याने संघाच्या संघ मालकीणीसोबत केलेल्या खास 'डील'संदर्भातील स्टारी
IPL 2025: संघ हरल्यावर खरडपट्टी काढणारे संजीव गोयंका चक्क पराभवानंतरही हसले, फोटो VIRAL
पंजाबच्या संघाकडून पदार्पणात गाजवलं होते मैदान, पण अजून तो तोरा दिसलाच नाही
पंजाबच्या ताफ्यातील तो क्रिकेटर दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल. २०१२ च्या हंगामात त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्स (सध्याचा दिल्ली कॅपिटल्स) संघाकडून IPL मध्ये पदार्पण केले होते. पहिल्या दोन हंगामात त्याला फारशी चमक दाखवता आली नव्हती. २०१४ च्या हंगामात त्याने पंजाबच्या संघाकडून पहिल्यांदा पदार्पण केले. आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासात त्याने याच हंगामात ४ अर्धशतकासह सर्वाधिक ५५२ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. ५ सामन्यात त्याने फक्त ३४ धावा केल्या आहेत. ३० ही यंदाच्या हंगामातील त्याची सर्वोच्च खेळी राहिलीये. याशिवाय ३ विकेट्सही त्याने आपल्या खात्यात जमा केल्याचे पाहायला मिळाले आहे.
यंदाच्या हंगामातील मैदानातील कामगिरीपेक्षा मालकीणीसोबतच्या 'डील'मुळे चर्चेत
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मैदानात धावांसाठी संघर्ष करतणारा मॅक्सवेल IPL मधील आपल्या संघाच्या सह मालकीणीसोबत बिझनेस पार्टनरशिपमुळे चर्चेत आहे. एका बाजूला आयपीएल स्पर्धा सुरु असताना ऑस्ट्रेलियन क्रिकेटरनं Drive FITT नावाच्या स्पोर्ट्स-फिटनेस कंपनीत गुंतवणूक केलीये. ऑस्ट्रेलियन उद्योगपती डेके स्मिथ आणि मार्क सेलर यांच्यासह बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा आणि भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल हे या कंपनीचे सह मालक आहेत. यात आता ग्लेन मॅक्सवेलचा समावेश झाला आहे.
Web Title: IPL 2025 PBKS vs KKR 31st Match Player To Watch Glenn Maxwell Of Preity Zinta Punjab Kings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.