Prabhsimran Singh Set New Record Fourth Consecutive Fifty For PBSK : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात प्रभसिमरन सिंग याने आणखी एका खास विक्रमाला गवसणी घातलीये. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने हंगामातील पाचवे अर्धशतक झळकवताना खास कामगिरी आपल्या नावे केलीये. २८ चेंडूत त्याने ७ चौकाराच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. एका हंगामात सलग ४ अर्धशतके झळकवणारा तो पहिला अनकॅप्ड फलंदाज ठरलाय. पंजाबकडून डावाला सुरुवात करताना सलग चार अर्धशतकासह त्याने ख्रिस गेल आणि लोकेश राहुल या दोघांना मागे टाकले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पंजाबकडून एका हंगामात सर्वाधिक वेळा ५० प्लस धावा करणारे सलामीवीर
- ४ प्रभसिमरन सिंग (२०२५)
- ३ ख्रिस गेल (२०१८)
- ३ केएल राहुल (२०१८)
- ३ केएल राहुल (२०१९)
- ३ केएल राहुल (२०२०)
"मला आजही आठवतंय..."; 'मुंबईकर' रोहित शर्मासाठी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची खास पोस्ट
Web Title: IPL 2025 PBKS vs DC Fourth Consecutive Fifty For Prabhsimran Singh Becomes First Uncapped Indian Do This
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.