IPL 2025 : धावपळ करून DC च्या ताफ्यात सामील झाल्यावर रोहितची विकेटही घेतली, पण...

एका बाजूला DC नं त्याच्यावर भरवसा दाखवला अन् दुसऱ्या बाजूला त्यानं युएईचं फ्लाइट पकडलं. परिणामी त्याच्या IPL मध्ये खेळण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 12:43 IST2025-05-24T12:43:15+5:302025-05-24T12:43:45+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 PBKS vs DC 66th Match Lokmat Player to Watch Mustafizur Rahman Delhi Capitals | IPL 2025 : धावपळ करून DC च्या ताफ्यात सामील झाल्यावर रोहितची विकेटही घेतली, पण...

IPL 2025 : धावपळ करून DC च्या ताफ्यात सामील झाल्यावर रोहितची विकेटही घेतली, पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 PBKS vs DC 66th Match Lokmat Player to Watch Mustafizur Rahman Delhi Capitals : दिल्ली कॅपिटल्सचा संघ MI विरुद्धच्या पराभवासह प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर पडला. टॉप ४ मध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी दिल्लीच्या संघाने बांगलादेशच्या गड्यावर ६ कोटींचा डाव खेळल्याचे पाहायला मिळाले. मिचेल स्टार्कची कमी भरून काढण्यासाठी मुस्तफिझुर रहमानला त्यांनी आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. एका बाजूला DC नं त्याच्यावर भरवसा दाखवला अन् दुसऱ्या बाजूला त्यानं युएईचं फ्लाइट पकडलं. परिणामी त्याच्या IPL मध्ये खेळण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. पण शेवटी त्याला बांगलादेश क्रिकेट बोर्डानं IPL खेळण्याची परवानगी दिली अन् गुजरात विरुद्धच्या सामन्यातून तो पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

DC कडून पदार्पणात उत्तम गोलंदाजी, पण...

यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात मुस्तफिझुर रहमान याला विकेट मिळाली नाही. पण गुजरात विरुद्ध त्याने ३ षटकात फक्त २४ धावा खर्च करत चांगली गोलंदाजी केली. MI विरुद्धच्या 'करो वा मरो' लढतीत त्याने रोहित शर्माला आपल्या जाळ्यात अडकवले. पण सूर्यकुमार यादवच्या दिमाखदार खेळीमुळे मुंबई इंडियन्सने हा सामना जिंकला. या सामन्यात मुस्तफिझुर रहमान याने ४ षटकात ३० धावा खर्च करत एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली होती. या खेळाडूला साखळी फेरीतील लढतीपर्यंतच IPL खेळण्याची परवानगी मिळाली होती. कारण २८ मे पासून बांगलादेश संघाची पाकिस्तान दौऱ्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका नियोजित आहे. या मालिकेसाठी पाकिस्तानला रवाना होण्याआधी मुस्तफिझुर रहमान दिल्लीच्या ताफ्यातून अखेरच्या सामन्यात छाप सोडणार का? ते पाहण्याजोगे असेल. 

IPL 2025 : प्रितीनं कोट्यवधी खर्च करून खरेदी केलाय हा 'हिरा'; पण तो चमकणार कधी?

LSG अन् SRH प्रमाणे DC ही प्लेऑफ्समधील ट्विस्ट वाढवणार ?

प्लेऑफ्समध्ये पोहचलेल्या चार संघामध्ये पहिल्या दोन स्थानासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. गुजरातचा संघ १८ गुणांसह सध्या गुणतालिकेत टॉपला आहे. त्यापाठोपाठ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज हे दोन संघ प्रत्येकी १७-१७ गुणांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असून मुंबई इंडियन्स १६ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. प्लेऑफ्समधून आउट झालेल्या लखनौच्या संघाने गुजरातला पराभूत केल्यावर सनरायझर्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध विजय मिळवला. परिणामी या दोन्ही संघाचे टॉप २ मधील स्थान भक्कम करण्याची संधी हुकली. जर आता दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आपल्या अखेरच्या सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध बाजी मारली तर प्लेऑफ्समधील ट्विस्ट आणखी वाढेल. स्पर्धेचा शेवट विजयासह गोड करण्यासाठी मुस्तफिझुर रहमान याने सर्वोच्च कामगिरी करावी, अशी संघाची अपेक्षा असेल. 

याआधी कशी राहिलीये त्याची IPL मधील कामगिरी?

३० वर्षीय बांगलादेशी गोलंदाजाने मुंबईच्या संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. २०२१ च्या हंगामात तो राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून खेळताना दिसले होते. २०२२-२३ च्या दोन हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळल्यावर गत हंगामात तो चेन्नई सुपर किंग्जकडून मैदानात उतरला होता. आयपीएलमध्ये ५९ सामन्यात त्याच्या खात्यात ६२ विकेट्स जमा आहेत. गत हंगामात चेन्नईकडून खेळताना त्याने २९ धावा खर्च करून ४ विकेट्स घेतल्या होत्या. ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.

Web Title: IPL 2025 PBKS vs DC 66th Match Lokmat Player to Watch Mustafizur Rahman Delhi Capitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.