IPL 2025 : आधी BSNL कडून टेनिस बॉलवर खेळायचा; यंदा दिल्लीनं मोठी रक्कम मोजलीये, पण...

तो अखेरच्या टप्प्यात दिल्ली कॅपिटल्ससाठी उपयुक्त कामगिरी करून दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 17:10 IST2025-05-08T17:08:48+5:302025-05-08T17:10:30+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 PBKS vs DC 58th Match Lokmat Player to Watch T Natarajan Delhi Capitals | IPL 2025 : आधी BSNL कडून टेनिस बॉलवर खेळायचा; यंदा दिल्लीनं मोठी रक्कम मोजलीये, पण...

IPL 2025 : आधी BSNL कडून टेनिस बॉलवर खेळायचा; यंदा दिल्लीनं मोठी रक्कम मोजलीये, पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 PBKS vs DC 58th Match Player to Watch T Natarajan Delhi Capitals : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात टी. नटराजन हा दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून खेळताना दिसतोय. दुखापतीतून सावरून पुन्हा कमबॅकसाठी सज्ज असलेल्या भारतीय जलदगती गोलंदाज आतापर्यंत IPL मध्ये ज्या सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून खेळताना दिसला त्या संघाविरुद्धच दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले. पण हा सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे नटराजनला गोलंदाजीची संधीच मिळाली नाही. पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात त्याच्या कमबॅकवर नजरा असतील. इथं एक नजर टाकुयात आयपीएलमधील त्याच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर...

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

BSNL टू कनेक्टिंग IPL! असा राहिलाय नटराजनचा खास प्रवास

टी. नटराजन हा टेनिस बॉल क्रिकेटच्या मैदानातून आयपीएलमध्ये एन्ट्री मारणारा क्रिकेटर आहे. तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत बीएसएनलचे प्रतिनिधीत्व करताना तो आपल्या गोलंदाजीमुळे प्रकाशझोतात आलेला खेळाडू आहे. २०१५ मध्ये  रणजी ट्रॉफी स्पर्धेत तमिळनाडूकडून आपल्या गोलंदाजीची छाप सोडल्यावर २०१७ मध्ये पंजाबच्या संघाने ३ कोटी रुपयांसह त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. त्यानंतर २०१८ ते २०२४ या कालावधीत तो सनरायझर्स हैदराबादचा प्रमुख गोलंदाजाच्या रुपात खेळला. आयपीएलमधील दमदार कामगिरीनंतर बीसीसीआयनेही त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडल्याचे पाहायला मिळाले आहे. यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सनं  १०.७५ कोटींसह त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे.      

IPL 2025 : प्रीतीची 'ती' चूक अन् तो! पंजाबच्या ताफ्यातील 'फिनिशर'ची गोष्ट

कशी राहिलीये IPL मधील नटराजनची आतापर्यंतची कामगिरी?

टी. नटराजन याने आतापर्यंत ६२ आयपीएल सामने खेळले असून त्याच्या खात्यात ६७ विकेट्स जमा आहेत. १९ धावा खर्च करून ४ विकेट्स ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च कामगिरी राहिली आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून  गत हंगामात ही कामगिरी करताना त्याने १४ सामन्यात १९ विकेट्स घेत संघाला फायनलपर्यंत पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. याशिवा  २०२०, २०२२ आणि २०२३ च्या हंगामात त्याने अनुक्रमे १६, १८ आणि १० विकेट्स घेत दुहेरी आकडा गाठला होता. दुखापतीतून सावरून पुन्हा क्रिकेटच्या मैदानात परतल्यावर आपल्यातील धमक दाखवून तो अखेरच्या टप्प्यात दिल्ली कॅपिटल्ससाठी उपयुक्त कामगिरी करून दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल. 

Web Title: IPL 2025 PBKS vs DC 58th Match Lokmat Player to Watch T Natarajan Delhi Capitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.