IPL 2025: Mumbai Indians चा स्टार जसप्रीत बुमराह RCB विरूद्ध खेळणार, कोण होणार संघाबाहेर?

Jasprit Bumrah Mumbai Indians, IPL 2025 MI vs RCB: तब्बल तीन महिन्यांनी बुमराह पुन्हा मैदानात खेळताना दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 08:58 IST2025-04-07T08:57:28+5:302025-04-07T08:58:56+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 Mumbai Indians star Jasprit Bumrah will play against RCB Ashwani Kumar maybe excluded in MI vs RCB clash | IPL 2025: Mumbai Indians चा स्टार जसप्रीत बुमराह RCB विरूद्ध खेळणार, कोण होणार संघाबाहेर?

IPL 2025: Mumbai Indians चा स्टार जसप्रीत बुमराह RCB विरूद्ध खेळणार, कोण होणार संघाबाहेर?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Jasprit Bumrah Mumbai Indians, IPL 2025 MI vs RCB: क्रिकेट चाहत्यांना ज्याच्या आगमनाची प्रतीक्षा होती, अखेर तो आयपीएलमध्ये परतला. मुंबईचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने दुखापतीतून सावरून रविवारी संघात प्रवेश केला, तो सोमवारी बंगळुरूविरुद्ध खेळण्यास सज्ज आहे, अशी माहिती खुद्द मुंबईचे मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी दिली. मुंबई संघाने सोशल मीडियावर एक विशेष व्हिडीओ पोस्ट करून बुमराहच्या आगमनाची माहिती दिली. त्याने रविवारी संध्याकाळी संघाच्या सराव सत्रात गोलंदाजीचा जोमाने सरावही केला. विशेष म्हणजे त्याच्या काही चेंडूंवर अनुभवी फलंदाज रोहित शर्माही चाचपडला. त्यामुळे बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे दिसून आले.

तीन महिन्यांनंतर करणार पुनरागमन

यंदाच्या जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच बुमराह क्रिकेटपासून दूर राहिला आहे. सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटीत पाठीच्या दुखापतीमुळे त्याने दुसन्या डावात माघार घेतली होती, तेव्हापासून तो दुखापतीतून सावरण्याच्या प्रक्रियेत होता. यादरम्यान त्याला इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसह चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतूनही माधार घ्यावी लागली होती. बंगळुरुविरुद्धच्या सामन्याआधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जयवर्धने म्हणाले की, "होय, बुमराह आमच्यासाठी उपलब्ध आहे. त्याने आमच्यासोबत पूर्ण ताकदीने सराव केला आहे. त्यामुळे तो आज खेळला पाहिजे. तो शनिवारी रात्री संघात पोहचला. 'एनसीए'तील सत्र पूर्ण करून तो येथे आला आहे. त्याला आधी आमच्या संघाच्या वैद्यकीय पथकाकडे पाठविण्यात आले. त्याने सराव सत्रात गोलंदाजीही केली, सर्वकाही ठीक असून तो सोमवारी खेळेल."

बुमराहकडून लगेच अपेक्षा करू नका!

जयवर्धन पुढे म्हणाले, "बुमराह मोठ्चा विश्रांतीनंतर खेळणार आहे. त्यामुळे त्याच्याकडून सुरुवातीपासूनच मोठ्या अपेक्षा करणे योग्य ठरणार नाही, पण जसप्रीतकडे पाहता तो यासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे. त्याच्या पुनरागमनानंतर आम्ही सर्व आनंदी आहोत. आता आमच्या गोलंदाजी आक्रमणात सर्वकाही आहे, केवळ अल्लाह (मोहम्मद गझनफर) याची अनुपस्थिती आहे. तो दुखापतग्रस्त आहे. पण इतर सर्व गोलंदाज तंदुरुस्त असून पूर्ण सत्रात ते संघासाठी योगदान देतील, अशी आशा आहे.'

कोण जाणार संघाबाहेर?

जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाज असल्याने त्याच्याजागी अश्वनी कुमारला संघबाहेर केले जाण्याची शक्यता आहे. अश्वनी कुमारने पहिल्या सामन्यात ४ बळी घेत सामनावीराचा किताब जिंकला होता. पण त्यानंतर त्याने दुसऱ्या सामन्यात फारशी चांगली कामगिरी केली नाही. ३ षटकांत त्याने ३९ धावा दिल्या आणि केवळ १ बळी घेतला. त्यामुळे त्याला संघाबाहेर केले जाण्याची शक्यता सर्वाधिक आहे.

Web Title: IPL 2025 Mumbai Indians star Jasprit Bumrah will play against RCB Ashwani Kumar maybe excluded in MI vs RCB clash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.