इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2025) आगामी हंगामा आधी मुंबई इंडियन्सचा नवा भिडू चर्चेत आला आहे. विकेट किपरच्या रुपात मुंबई इंडियन्सच्या संघानं रॉबिन मिंझला आपल्या ताफ्यात सामील करून घेतलंय. या पठ्ठ्यानं नेट्स प्रॅक्टिस वेळी तगडी बॅटिंग करत यंदाचा हंगामासाठी सज्ज असल्याचे संकेतच दिले आहेत. एवढेच नाहीतर त्यानं आपल्या क्लास फटकेबाजीत धोनीची कॉपीही केल्याचे पाहायला मिळाले. विकेट किपर बॅटरचा हा अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरतोयॉ.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आल्या आल्या धुलाई सुरु...
मुंबई इंडियन्सच्या संघाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन नव्या हिरोच्या तुफान फटकेबाजी व्हिडिओ शेअर केला आहे. " आरे आतेही धुलाई शुरु.." या खास कॅप्शनसह MI नं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रॉबिन मिंझ प्रत्येक चेंडूवर तुटून पडल्याचे दिसून येते.
अन् त्याच्या भात्यातून निघाला धोनी मारतो तसा नो लूक सिक्सर नेट्समधील फटकेबाजी वेळी त्याने मारलेला एक फटका हा 'मोहरा' मुंबई इंडियन्सचा, पण तोरा एमएस धोनीचा असे चित्रही पाहायला मिळाले. रॉबिन मिंझनं लेग साइडच्या दिशेन उत्तुंग फटका मारल्यावर चेंडूकडे पाहिलेही नाही. त्याचा हा फटका धोनीच्या नो लूक शॉटची आठवण करून देणारा होता. हा विकेट किपर बॅटर देखील धोनीप्रमाणे रांचीचाच आहे.
ईशानच्या जागी त्यालाच मिळू शकते पहिली पसंती
गत हंगामात गुजरात टायटन्सच्या संघानं ३.६ कोटीसह या खेळाडूवर मोठा डाव खेळला होता. पण अपघातामुळे त्याला संपूर्ण हंगामाला मुकावे लागले. २०२५ च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सच्या संघाने ६५ लाख रुपयांसह त्याला करारबद्ध केले. रायन रिकल्टन आणि कृष्णन श्रीजीत यांच्यासह MI च्या ताफ्यातील तो तिसरा विकेट किपर बॅटर आहे. ईशान किशनच्या जागी हा MI चा पहिल्या पसंतीचा विकेट किपर बॅटर असू शकतो.