Join us

Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो

Jasprit Bumrah Instagram Post: मुंबईचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याची पत्नी संजना गणेशनला डेटवर नेल्याचा फोटो शेअर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 14:12 IST

Open in App

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात खराब सुरुवात केल्यानंतर मुंबई इंडियन्सने जबरदस्त पुनरागमन केले आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईने सलग सहा सामने जिंकले आहेत. आयपीएलच्या गुणतालिकेत मुंबईचा संघ १४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याची पत्नी संजना गणेशनला डेटवर नेल्याचा फोटो शेअर केला आहे. दोघांच्या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.

जसप्रीत बुमराहने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पत्नीसोबतचा सुंदर फोटो शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'आई आणि बाबा सुशी डेट' असे लिहिण्यात आले. जसप्रीत बुमराहने १५ मार्च २०२१ रोजी स्पोर्ट्स अँकर संजना गणेशनशी लग्न केले. दोघांचेही लग्न गोव्यात झाले. संजना मिस इंडिया फायनलिस्ट होती. याशिवाय, ती एमटीव्ही स्प्लिट्सव्हिलामध्येही झळकली. बुमराह आणि संजनाची भेट आयपीएलमधील एका मुलाखतीदरम्यान झाली. जसप्रीत बुमराहशी लग्न केल्यानंतर संजानाने ४ सप्टेंबर २०२३ रोजी त्यांच्या मुलाला जन्म दिला. या मुलाचे नाव त्यांनी अंगद असे ठेवले.

बुमराहने आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत एकूण ७ सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ११ विकेट घेतल्या आहेत. या हंगामात त्याचा सर्वोत्तम स्पेल लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध होता. त्याने लखनौविरुद्ध ४ षटकांत २२ धावा देत ४ विकेट घेतल्या. बुमराह हा जगातील सर्वात धोकादायक गोलंदाजांपैकी एक आहे. आयपीएलमध्ये मुंबईच्या उर्वरित सामन्यात त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.

मुंबई इडियन्सची जबरदस्त कामगिरीमुंबई इंडियन्सने आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यांपैकी ७ सामने जिंकले आहेत आणि ४ सामन्यात पराभव पत्करला आहे. या संघाचा नेट रन रेट सर्वोत्तम आहे (+१.२७४) आणि १४ गुणांसह, तो पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईचा पुढील सामना ६ मे रोजी वानखेडे स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध आहे. आयपीएल प्लेऑफच्या दृष्टीने हा सामना खूप महत्त्वाचा असेल. गुजरातविरुद्ध विजय मिळवल्यास मुंबईचा संघ प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित करतील. आरसीबी १६ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५मुंबई इंडियन्सजसप्रित बुमराहव्हायरल फोटोज्