Rohit Sharma Fan Moment Mumbai Indians, IPL 2025 CSK vs MI viral video: आयपीएलच्या नव्या हंगामाची शनिवारपासून सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात RCB ने KKR ला पराभूत केले. आज रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी कसून सराव केला आहे. मुंबईचा नियमित कर्णधार हार्दिक पांड्या तांत्रिक कारणामुळे पहिल्या सामन्याला मुकणार आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली MI चा संघ मैदानात उतरणार आहे. या संघात मूळ आकर्षण असेल रोहित शर्मा. रोहितने गेल्या IPL नंतर दोन ICC विजेतेपदे मिळवली आहेत. त्यामुळे तो सर्वांच्या गळ्यातला ताईत झाला आहे. रोहितचा चाहता वर्ग भरपूर असून त्यात लहानांपासून मोठ्यापर्यंत साऱ्यांचाच समावेश आहे. सध्या अशाच एका लहान मुलीची रोहितशी भेट झाल्याचे व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
भारतात क्रिकेटला धर्म मानले जाते. त्यामुळे भारतीय क्रिकेटमधील काही खेळाडू हे त्यांच्या चाहत्यांसाठी देवच असतात. साहजिकपणे आपला आवडता क्रिकेटपटू भेटला की युवा चाहतावर्ग त्यांच्या पाया पडतो. अशीच एक १६ वर्षांची मुलगी रोहित शर्माला भेटायला आली. ती येताच रोहितच्या पाया पडू लागली, पण रोहितने तिला थांबावलं. पाया पडू नको असं म्हणत अतिशय आपुलकीने तिची विचारपूस केली. तिने आणलेल्या टी-शर्टवर ऑटोग्राफ दिला आणि तिच्यासोबत फोटोही क्लिक केला. हा घटनेनंतर त्या मुलीच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला होता. मोनिका बोहरा असे त्या मुलीचे नाव असून तिने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात रोहितच्या मनाचा मोठेपणा तर दिसलाच, पण त्यासोबतच तरुण मुलेच नव्हे तर मुलींमध्येही रोहितची किती क्रेझ आहे, हे दिसून येते. पाहा व्हिडीओ-
CSK VS MI यांच्यात कोण कुणावर पडलंय भारी?
आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात ३७ सामने खेळवण्यात आले आहेत. यात मुंबई इंडियन्सच्या संघाने २० सामन्यात तर चेन्नईच्या संघानं १७ सामन्यात विजय नोंदवला आहे. चेन्नई सुपर किंग्जची सर्वोच्च धावसंख्या २१८ धावा असून त्यांची निच्चांकी धावसंख्या ७९ धावा अशी आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या संघाने चेन्नई विरुद्ध २१९ धावांसह सर्वोच्च धावसंख्या उभारली असून १३६ ही त्यांची निच्चांकी धावसंख्या आहे.