आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ३३ वा सामना मुंबई येथील वानखेडे क्रिकेट स्टेडियम खेळवण्यात आला. घरच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात हैदराबादच्या संघाने दिलेले १६३ धावांचे टार्गेट पार करत मुंबई इंडियन्सच्या संघाने यंदाच्या हंगामातील तिसऱ्या विजयाची नोंद केली. या सामन्यात जसप्रीत बुमराहने कमालीची गोलंदाजी करताना ४ षटकात २१ धावा खर्च करत एक विकेटही घेतली. दुखापतीतून सावरून मैदानात उतरलेल्या जसप्रीत बुमराहनं तिसऱ्या सामन्यात दुसरी विकेट घेताना हेनरिच क्लासेनची शिकार केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संजना गणेशन हिने मुलाचा हात उंचावत असा व्यक्त केला आनंद
बुमराहने सनरायझर्स हैदराबादचा स्टार फलंदाज हेनरिच क्लासेन याचा फुलटॉस चेंडूवर त्रिफळा उडवला. क्लासेन ३७ धावांवर बाद झाला. या विकेटनंतर स्टेडियम स्टँडमध्ये बसलेली बुमराहची पत्नी आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशनसह तिच्या मुलाच्या रिअॅक्शनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. संजना अंगद याचा हात उंचावून क्लासेनच्या विकेटचा आनंद व्यक्त करताना दिसली.
IPL 2025 MI vs SRH : वानखेडेच्या खेळपट्टीनं रंग बदलला; पण MI नं विजयाचा ट्रॅक नाही सोडला!
व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना ही एक स्पोर्ट्स अँकर आहे. बुमराहने गोलंदाजीसह तर तिने बोलंदाजीसह आपला एक वेगळा चाहतावर्ग कमावला आहे. बहुतांश वेळा अँकरच्या रुपात दिसणारी संजना यावेळी आपला मुलगा अंगद याला मांडीवर घेऊन बुमराहला चीअर करताना दिसली. जसप्रीत बुमराहच्या खात्यात विकेट जमा झाल्यावर कॅमेरा संजना अन् अंगद यांच्याकडे फिरल्याचे पाहायला मिळाले.