Join us

IPL 2025 MI vs RCB : हिटमॅनचा फ्लॉप शो कायम! रितिकाचा चेहरा पडला; 'विराट' सेलिब्रेशनही चर्चेत

रोहित शर्मानं कडक सुरुवात केली, पण दुसऱ्या षटकातच त्याने विकेट फेकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 22:57 IST

Open in App

IPL 2025 MI vs RCB Watch Yash Dhayal Bold Rohit Sharma  : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबई इंडियन्ससमोर २२२ धावांचे टार्गेट सेट केले. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन या जोडीनं मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात केली. रोहित शर्मानं कडक अंदाजात सुरुवात केली. पण त्याचा फ्लॉप शो कायम राहिला. संघाला चांगली सुरुवात करुन दिल्यावर रोहित दुसऱ्याच षटकात क्लीन बोल्ड झाला.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

रोहितचा आक्रमक अंदाज दुसऱ्याच षटकात ढळून पडला

भुनवेश्वर कुमारच्या पहिल्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव खेळल्यावर या षटकात त्याने एक चौकार आणि एका षटकारासह १३ धावा कुटल्या. दुसऱ्या षटकात यश दयालच्या गोलंदाजीवर त्याने दोन खणखणीत चौकार मारले. पण तिसऱ्याच चेंडूवर त्याचा आक्रमक अंदाज गळून पडला. यश दयालनं हिटमॅनचा त्रिफळा उडवला. हिटमॅनचा फ्लॉप शोचा सिलसिला पुन्हा कायम राहिला.

MI vs RCB : रजत पाटीदारसह या पठ्ठ्याची किंग कोहलीपेक्षाही कडक बॅटिंग! २०० प्लस स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा

स्टँडमध्ये बसलेल्या रितिकाचा चेहरा पडला, विराटचे सेलिब्रेशनही चर्चेत

रोहित शर्माचा त्रिफळा उडल्यावर स्टँडमध्ये बसलेल्या रितिका सजदेहचा चेहराच पडला. तिच्या रिअ‍ॅक्शनसह किंग कोहलीच्या सिलिब्रेशनची सोशल मीडियावर चर्चा रंगल्याचे दिसून आले. विराट कोहलीनं आक्रमक अंदाजात रोहितच्या विकेटचे सेलिब्रेशन केले. रोहित शर्मा आयपीएलमधील तीन सामन्यात अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. चौथ्या सामन्यात दुखापतीमुळे बाकावर बसण्याची वेळ आल्यावर तो घरच्या मैदानात आपला तोरा दाखवून देईल, अशी अपेक्षा होती. पण पुन्हा त्याच्या पदरी निराशा आली. 

रोहितचा फ्लॉप शोचा सिलसिला कायम!

रोहित शर्माला सलामीच्या सामन्यात खातेही उघडता आले नव्हते. दुसऱ्या सामन्यात त्याने दौन चौकाराच्या मदतीने ८ धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याने दुहेरी आक़डा गाठला, पण त्याची इनिंग १३ धावांवरच थांबली. चौथ्या सामन्यात त्याने १७ धावांवर तंबूचा रस्ता धरला. चार सामन्यात त्याने फक्त ३८ धावा केल्या आहेत.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५मुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोररोहित शर्माविराट कोहली