IPL 2025 : धाकट्यानं मैदान गाजवल्यावर थोरल्याला मिळाली संधी; दोन्ही भावांना मोठं करण्यात MI चा हात

धाकटा भाऊ हार्दिक पांड्या घरवापसी करत मुंबई इंडियन्सचा कॅप्टन झालाय.  दुसरीकडे थोरला भाऊ क्रुणाल पांड्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाकडून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळतय.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 12:28 IST2025-04-07T12:24:52+5:302025-04-07T12:28:17+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 MI vs RCB 20th Match Lokmat Player to Watch Krunal Pandya Royal Challengers Bengaluru vs Hardik Pandya Mumbai Indians | IPL 2025 : धाकट्यानं मैदान गाजवल्यावर थोरल्याला मिळाली संधी; दोन्ही भावांना मोठं करण्यात MI चा हात

IPL 2025 : धाकट्यानं मैदान गाजवल्यावर थोरल्याला मिळाली संधी; दोन्ही भावांना मोठं करण्यात MI चा हात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 MI vs RCB 20th Match Player to Watch Krunal Pandya vs Hardik Pandya :  आयपीएलच्या मैदानात राष्ट्रीय संघाकडून एकत्र खेळणारे खेळाडू एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतात. या अध्यायात दोन भावाभावांचाही एक खास चॅप्टर आहे. IPL मध्ये आधी धाकट्यानं मैदान गाजवलं. त्याच संघातून मग थोरल्यानं दाबात एन्ट्री मारली. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून मोठी झालेली ही भावाभावांची जोडी म्हणजे पांड्या ब्रदर्स. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून आयपीएलमध्ये पदार्पण करणारी ही जोडी आता वेगवेगळ्या फ्रँचायझीकडून खेळताना दिसत आहे. धाकटा भाऊ हार्दिक पांड्या घरवापसी करत मुंबई इंडियन्सचा कॅप्टन झालाय.  दुसरीकडे थोरला भाऊ क्रुणाल पांड्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाकडून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळतय.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

एकाच फ्रँचायझीकडून दोन्ही भावांनी धमाक्यात केलं होत पदार्पण

पांड्या ब्रदर्समध्ये क्रुणाल थोरला अन् हार्दिक पांड्या धाकटा. पण हार्दिक पांड्याने आयपीएलमध्ये पहिला नंबर लावला. २०१५ मध्ये मुंबई इंडियन्सकडून त्याने धमाक्यात पदार्पण केले होते. या हंगामात  कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध ३१ चेंडूत ६१ धावा करत मैफिल लुटली होती. मग २०१६ च्या हंगामात क्रुणाल पांड्याला याच फ्रँचायझीमध्ये संधी मिळाले. एकही प्रथम श्रेणी सामना न खेळता क्रुणाल मुंबई इंडियन्सकडून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. पदार्पणाच्या हंगामात दिल्ली डेअरडेविल्स संघाविरुद्ध त्याने ३७ चेंडूत ८६ धावांची लक्षवेधी केल्याचे पाहायला मिळाले होते. 

IPL 2025 : MI च्या टेन्शन वरची मात्रा अन् विजयाची हमी! पण मनात सलते त्याच्या या गोष्टीची कमी

दोन नवे संघ आले अन् भावाभावांची जोडी फुटली

मुंबई फ्रँचायझी संघाकडून खेळताना आपल्यातील धमक दाखवून देत दोन्ही भावांनी टीम इंडियात संधी मिळाली. ज्या मुंबई इंडियन्सनं या भावाभावांना मोठं केले त्या संघाकडून २०२१ च्या हंगामापर्यंत ते एकत्र खेळताना पाहायला मिळाले. २०२२ मध्ये आयपीएलमध्ये दोन नव्या संघांची एन्ट्री झाली. लखनौ सुपर जाएंट्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आयपीएलमधील एन्ट्रीसह या भावाभावांची जोडी फुटली. क्रुणाल पांड्या लखनौचा झाला अन् हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सचा कर्णधार झाला.

नव्या हंगामात नवे चित्र; हार्दिक पांड्याची घरवापसी अन् क्रुणाल मिळाला तिसरा नवा संघ

२०२२ च्या हंगामाआधी दोघे भाऊ भाऊ मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून बाहेर पडले. हार्दिक पांड्याने या हंगामात गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना पदार्पणाच्या हंगामातच या फ्रँचायझी संघाला चॅम्पिय केले. त्यानंतर गत हंगामात हार्दिक पांड्याची पुन्हा घरवापसी झाली. तो मुंबई इंडियन्सचा कॅप्टन झाला. दुसऱ्या बाजूला क्रुणाल पांड्या हा मागील तीन हंगामात लखनौच्या ताफ्यातूनच खेळताना दिसला. आता नव्या हंगामात क्रुणाल पांड्या आरसीबीच्या जर्सीत दिसत आहे. आयपीएलमध्ये क्रुणाल पांड्याचा RCB हा तिसरा संघ आहे. पांड्या प्रत्येक हंगामात चर्चेत असला तरी क्रुणाल पांड्या मुंबईतून बाहेर पडल्यापासून फारसा चर्चेत दिसला नाही. पण आरसीबीकडून तो पुन्हा आपल्यातील खास धमक दाखवून लक्षवेधून घेत आहे. यंदाच्या हंगामात दोन भाऊ समोर भिडतील. एकमेकांविरुद्ध भिडण्यासह यंदाच्या हंगामात दोघांत कोण भारी ठरणार ते पाहण्याजोगे असेल.  


 

Web Title: IPL 2025 MI vs RCB 20th Match Lokmat Player to Watch Krunal Pandya Royal Challengers Bengaluru vs Hardik Pandya Mumbai Indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.