IPL 2025 MI vs RCB 20th Match Player to Watch Jasprit Bumrah Mumbai Indians : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यासाठी यॉर्करचा राजा जसप्रीत बुमराह सज्ज झाला आहे. दुखापतीतून सावरून पुन्हा मैदानात उतरणे कोणत्याही गोलंदाजासाठी एक मोठे चॅलेंज असते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध बुमराहसमोरही ते असेल. पण गत हंगामातीलच नव्हे तर RCB विरुद्धची त्याची एकंदरीत आकडेवारी आणि गत हंगामातील कामगिरी या गोष्टी जसप्रीत बुमराहसाठी जमेची बाजू असल्यामुळे तो झोकात कमबॅक करेल, अशी आशा आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबई इंडियन्सला ट्रॅकवर आणण्यासाठी धावणार बुमराह
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील सिडनी कसोटी सामन्यात पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराहला मैदान सोडावे लागले होते. या दुखापतीमुळे घरच्या मैदानातील इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसह तो चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला मुकला. बुमराहशिवाय मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सची यंदाच्या हंगामाची सुरुवात ही अडखळत झाली. पहिल्या चार सामन्यात फक्त एका सामन्यात संघाने विजय मिळवला आहे. संघाला ट्रॅकवर आणण्यासाठी आता बुमराह धावणार असल्यामुळे मुंबई इंडियन्सलाही मोठा दिलासा मिळाला आहे.
IPL 2025: Mumbai Indians चा स्टार जसप्रीत बुमराह RCB विरूद्ध खेळणार, कोण होणार संघाबाहेर?
IPL मधील जसप्रीत बुमराहची RCB विरुद्धची कामगिरी
आयपीएलमध्ये जसप्रीत बुमराह RCB विरुद्ध एकूण १९ सामने खेळले असून यात त्याच्या खात्यात २९ विकेट्स जमा आहेत. २१ धावा खर्च करून ५ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. गत हंगामात वानखेडेच्या मैदानात खेळतानाच त्याने ही कामगिरी केली होती. पुन्हा एकदा आरसीबी विरुद्ध आपली धमक दाखवून तो बुमराह कमबॅकच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला हंगामातील दुसरा विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणार का? ते पाहण्याजोगे असेल.
टीम इंडिया असो वा मुंबई इंडियन्स; बुमराह म्हणजे टेन्शन वरची मात्रा
जसप्रीत बुमराह हा क्रिकेट जगतातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. सातत्याने आपल्या भेदक माऱ्याने त्याने प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांमध्ये आपली एक दहशत निर्माण केली आहे. परफेक्ट यॉर्करसह गोलंदाजीतील भेदक माऱ्यानं सामन्याला एकहाती कलाटणी देण्याची क्षमता असल्यामुळे त्याच्यासह मैदानात उतरणाऱ्या संघाला विजयाची एक गॅरेंटी मिळते. टीम इंडिया असो वा मुंबई इंडियन्स बुमराह असला की प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना टेन्शन येणारच.
जबरदस्त रेकॉर्ड, पण एकदाही नाही मिळाली पर्पल कॅप
जसप्रीत बुमराह हा विजयाची हमी देणारा गोलंदाज आहे. आयपीएलमधील त्याचा रेकॉर्डही अगदी उत्तम आहे. आयपीएल इतिहासातील त्याची कामगिरी बघताना एक गोष्ट मनाला सलत राहणारी आहे. ती म्हणजे पर्पल कॅपच्या विजेत्यांमध्ये त्याचे नाव काही दिसत नाही. २०१३ ते २०२४ या कालावधीत जसप्रीत बुमराहानं आयपीएलमध्ये १३३ सामन्यात १६५ विकेट्स घेतल्या आहेत. चार हंगामात त्याने २० विकेट्सचा आकडा गाठला. २०२० च्या हंगामात २७ विकेट्स घेत त्याने मुंबई इंडियन्सला ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाची भूमिक बजावली होती. पण त्याच्या नशिबात पर्पल कॅप काही दिसलेली नाही. यावेळी ३० विकेटसह रबाडाने बाजी मारली होती.
Web Title: IPL 2025 MI vs RCB 20th Match Lokmat Player to Watch Jasprit Bumrah Mumbai Indians
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.