IPL 2025 MI vs RCB 20th Match : मुंबईतील वानखेडच्या मैदानात रंगणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यातून जसप्रीत बुमराह यंदाच्या हंगामाची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. या सामन्याआधी मुंबई इंडियन्सच्या स्टार गोलंदाला RCB च्या ताफ्यातील गड्याने दुसऱ्याच्या जीवावर चॅलेंज दिल्याचे पाहायला मिळत आहे. विराट कोहली आणि फिल सॉल्ट ही सलामी जोडी जसप्रीत बुमराहच्या पहिल्या चेंडूवर चौकार किंवा षटकार मारुन त्याचे स्वागत करतील, अशी अपेक्षा टीम डेविडनं बोलून दाखवली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जसप्रीत बुमराहच्या कमबॅकवर नजरा
जसप्रीत बुमराह हा बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत खेळत असताना दुखापतग्रस्त झाला होता. पाठीच्या दुखापतीतून सावरून तो आता मुंबई इंडियन्सकडून मैदानात उतरणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात तो कशी कामगिरी करणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. ४ पैकी ३ सामने गमावेल्या मुंबई इंडियन्सला तो विजयी पथावर आणेल अशी आस आहे.
हार्दिक पांड्या मॅच जिंकण्यासाठी खेळणार मोठा डाव, Mumbai Indians संघात करणार २ बदल
टीम डेविडनं सहकाऱ्यांच्या जीवावर दिलं बुमराहला चॅलेंज
मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्याआधी आरसीबीच्या ताफ्यातील टीम डेविड याने पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी त्याने आरसीबीचे सलामीवीर बुमराहचा सामना करण्यासाठी तयार आहेत, असे म्हटले आहे. तो म्हणाला की, जसप्रीत बुमराह हा सर्वोत्तम गोलंदाज आहे. पण आरसीबीचा संघ सर्वोत्तम आव्हान परतवून लावण्यासाठी तयार आहे. जर यंदाची स्पर्धा गाजवायची असेल तर सर्वोत्तम संघासह सर्वोत्तम खेळाडूला मात देणे गरजेचे आहे. मला आशा आहे की, आज रात्री ज्यावेळी बुमराह पहिले षटक घेऊन येईल त्यावेळी आमच्या डावाची सुरुवात करणारे बॅटर त्याच्या पहिल्या चेंडूवर चौकार किंवा षटकार मारतील. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात फिल सॉल्ट आणि विराट कोहली ही जोडी आरसीबीच्या डावाची सुरुवात करते. ही जोडी बुमराहचा सामना करण्यासाठी तयार आहे, असे त्याने म्हटले आहे.
सर्वोत्तम गोलंदाजाचा सामना करण्यासाठी उत्सुक
टीम डेविड पुढे म्हणाला की, जसप्रीत बुमराह उत्तम यॉर्कर टाकतो. तो एक सर्वोत्तम गोलंदाज आहे. तुम्ही जेव्हा सर्वोत्तम संघ आणि सर्वोत्तम खेळाडूसमोर चांगली कामगिरी करता त्यावेळी एक वेगळा अनुभव असतो. मी संपूर्ण ताकद लावून खेळण्याचा प्रयत्न करेन, असेही तो म्हणाला आहे.