IPL 2025 MI vs RCB 20th Match : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील २० व्या लढतीत मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन संघ मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मैदानात उतरले आहेत. हा सामना जसप्रीत बुमराहसाठी खास आहे. कारण तो दुखापतीतून सावरुन या सामन्यातून यंदाच्या हंगामाची सुरुवात करतोय. दुसरीकडे मागच्या मॅचमध्ये गुडघ्याच्या दुखापतीमुळे बाकावर बसलेला रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेयरच्या रुबात खेळताना दिसतोय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अनुभवी बुमराहच्या कमबॅकमुळे पदार्पणात हवा करणारा भिडू प्लेइंग इलेव्हनमधून आउट घरच्या मैदानात रंगलेल्या आरसीबी विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकल्यावर मुंबई इंडियन्सचा संघ बदलासह मैदानात उतरत असल्याचे हार्दिक पांड्याने स्पष्ट केले. पदार्पणात ४ विकेट्स घेऊन लक्षवेधी ठरलेल्या युवा अश्वनी कुमार याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये जसप्रीत बुमराहची एन्ट्री झाली आहे. रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात संघात असून तो धावांचा पाठलाग करताना बॅटिंगला येणार का? एवढेच नाही तर तो घरच्या मैदानात प्रभाव टाकणारी खेळी करून दाखवणार का? तेही पाहण्याजोगे असेल. अश्वनी कुमार याचे नाव इम्पक्ट प्लेयरच्या यादीत आहे. पण मुंबई इंडियन्सचा संघ धावांचा पाठलाग करणार असल्यामुळे त्याला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. रोहितच इम्पॅक्टच्या रुपात मैदानात उतरल्याचे पाहायला मिळू शकते.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन
विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकिपर बॅटर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, विघ्नेश पुथूर.
मुंबई इंडियन्स इम्पॅक्ट प्लेयर : रोहित शर्मा, कॉर्बिन बॉश, रॉबिन मिंझ, अश्वनी कुमार, राज बावा
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग इलेव्हन
फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकिपर बॅटर), टिम डेविड, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू इम्पॅक्ट प्लेयर : रसिक दार सलाम, सुयश शर्मा, स्वस्तिक चिकारा, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग