मुंबई इंडियन्सच्या संघानं वानखेडेच्या घरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाला ५४ धावांनी पराभूत करत सलग पाचव्या विजयासह स्पर्धेतील सहावा विजय नोंदवला. संघाच्या विजयात जसप्रीत बुमराहने मोलाचा वाटा उचलला. कमबॅकनंतर त्याने ४ विकेट्स हॉलसह लखनौच्या फलंदाजांचे कंबरडे मोडल्याचे पाहायला मिळाले. लखनौच्या ताफ्यातून दमदार कामगिरी करत असलेल्या मार्करमसह, अब्दुल समद आणि किलर डेविड मिलरला तंबूचा रस्ता दाखवणाऱ्या जसप्रीत बुमराहला या सामन्यात फिरकीपटू रवी बिश्नोईनं एक गगनचुंबी षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. षटकार मारल्यावर रवी बिश्नोईनं शतक मारल्याच्या तोऱ्यात सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. ज्याची सध्या चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रवी बिश्नोईचा आनंद गगनात मावेना, बुमराहसमोर असं केलं सेलिब्रेशन
मुंबई इंडियन्सकडून दमदार गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहनं खास विक्रमाला गवसणी घातली. लसिथ मलिंगाला मागे टाकत जसप्रीत बुमराह हा MI कडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. मॅच मुंबई इंडियन्सच्या बाजूनं झुकलेली असताना तळाच्या फलंदाजीत खेळताना रवी बिश्नोईनं १८ व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर बुमराहच्या गोलंदाजीवर लाँगऑनच्या दिशेनं उत्तुंग षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. मग त्याने या षटकार मारल्याचा आनंदही साजरा केला. त्याचा तोरा बघून बुमराहनेही स्मितहास्य दिले.
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
डगआउटमध्ये पंत अन् झहीरची रिॲक्शनही बघण्याजोगी
संघ पराभवाच्या छायेत असताना रवी बिश्नोईचा षटकार मारल्यावर आनंदी आनंद गडे सीन पाहून डग आउटमध्ये बसलेला कॅप्टन रिषभ पंत आवाक झाला. आरे हा काय करतोय..अशा काहीशा भावना व्यक्त करत तो रवी बिश्नोईकडे बोट करून काहीतरी बडबडताना दिसला. यावेळी LSG मेंटॉर झहीर खानची रिॲक्शनही बघण्याजोगी होती.