IPL 2025 MI vs GT Rohit Sharma Angry On Naman Dhir's Poor Shot Selection : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ स्पर्धेतील गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सची तगडी बॅटिंग ऑर्डर कोलमडली. रायन रिकल्टन आणि रोहित शर्मा पॉवर प्लेमध्येच तंबूत परतले. आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यावर नमन धीरवर मोठी जबाबदारी येऊन पडली होती. पण त्यानेही धीर सोडला अन् चुकीची फटका खेळत ही जबाबदारी झटकली. त्याच्या खेळण्याचा हा अंदाज डगआउटमध्ये बसलेल्या रोहित शर्माला खटकल्याचे पाहायला मिळाले. नमन धीरनं आपली विकेट गमावल्यावर रोहित शर्मा संतापल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नमन धीरनं चुकीचा फटका खेळत गमावली विकेट
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल याने वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजसह अन्य गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत मुंबई इंडियन्सला धक्क्यावर धक्के दिले. १३ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर साई किशोर याने हार्दिक पांड्याच्या रुपात मुंबई इंडियन्सच्या संघाला पाचवा धक्का दिला. धावफलकावर ५ बाद १०६ धावा असताना नमन धीर मैदानात उतरला. त्याच्याकडून दमदार खेळीची अपेक्षा होती. पण १६ व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर त्याने चुकीचा फटका खेळून आपली विकेट फेकली.
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
रोहित शर्माची रिॲक्शन व्हायरल
प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर तो पुल फटका खेळण्याच्या नादात फसला. MI नं ही विकेट गमावल्यावर रोहित शर्माची रिॲक्शन चर्चेचा विषय ठरत आहे. हा फटका त्याने कुठे खेळायला हवा होता असा इशारा करत रोहित त्याच्या शॉट सिलेक्शनवर संताप व्यक्त करताना दिसून आले.
विल जॅक्सचं अर्धशतक अन् सूर्या भाऊचा तोरा
पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबई संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या विल जॅक्सनं ३५ चेंडूत ५३ धावा केल्या. त्याच्याशिवाय सूर्यकुमार यादवनं २४ चेंडूत केलेल्या ३५ धावा आणि कॉर्बिन बॉशच्या २२ चेंडूतील उपयुक्त अशा २७ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या मोबदल्यात १५५ धावांपर्यंत मजल मारली.
Web Title: IPL 2025 MI vs GT Naman Dhir's poor shot selection leaves Rohit Sharma extremely angry in MI vs GT clash Watch Viral Vidoe
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.