IPL 2025 MI vs GT Eliminator Match Lokmat Player to Watch Jonny Bairstow Mumbai Indians : आयपीएलच्या १८ व्या हंगामात मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात एलिमिनेटरची लढत रंगणार आहे. न्यू पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या चंडीगड येथील महाराजा यादविंद्रसिंग मुल्लानपूर स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्याआधी MI च्या ताफ्यातील दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी MI ची साथ सोडलीये. सलामीवीर रायन रिकल्टन आणि कॉर्बिन बॉश वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी मायदेशी परतले आहेत. याशिवाय इंग्लंडचा विल जॅक्सह आता MI चा भाग नसेल. गुजरात टायटन्स विरुद्धच्या 'करो वा मरो' लढतीत MI चा संघ मोठ्या बदलासह मैदानात उतरु शकतो. यावेळी रोहितसोबत डावाची सुरुवात करताना नवा गडीही पाहायला मिळेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
प्लेऑफ्सआधी MI च्या संघान खेळलाय मोठा डाव
मुंबई इंडियन्सच्या संघाने या तिघांच्या जागी बदली खेळाडूच्या रुपात इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टो (५.२५ कोटी), रिचर्ड ग्लीसनसह (१ कोटी) श्रीलंकेच्या चरिथ असलंका (७५ लाख) याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. बेअरस्टोसाठी मुंबई इंडियन्सच्या संघाने तब्बल ५.२५ कोटी एवढी मोठी रक्कम मोजलीये. एलिमिनेटरच्या लढतीत तोच रोहित शर्माच्या साथीनं मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात करताना दिसू शकतो.
जॉनी बेअरस्टो रोहितसोबत करू शकतो MI च्या डावाची सुरुवात
जॉनी बेअरस्टोसाठी आयपीएल स्पर्धा तशी नवी नाही. पण तीन वर्षांच्या अंतराने तो पुन्हा एकदा मैदानात कमबॅकसाठी सज्ज असेल. २०२३ आणि २०२४ च्या हंगामात तो पंजाब किंग्ज संघाचा भाग होता. पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. रायन रिकल्टनची उणीव भरून काढण्याची क्षमता या ३५ वर्षीय इंग्लिश क्रिकेटपटूमध्ये आहे. २०१९ आणि २०२१ च्या हंगामात त्याने सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून खास छाप सोडलीये.
२०१९ च्या हंगामात केला होता धमाका, असा आहे त्याचा IPL मधील रेकॉर्ड
जॉनी बेअरस्टो याने २०१९ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातून मोठा धमाका केला होता. या हंगामात १० सामन्यात त्याने ४४५ धावा करताना एका शतकासह २ अर्धशतके झळकावली होती. जॉनी बेअरस्टोनं आतापर्यंत ५० आयपीएल सामने खेळले असून १४४.४५ च्या स्ट्राइक रेटसह त्याने २ शतके आणि ९ अर्धशतकाच्या मदतीने १५८९ धावा काढल्या आहेत. बेअरस्टो याने फेब्रुवारीमध्ये जोबर्ग सुपर किंग्जकडून शेवटचा टी-२० सामना खेळला आहे.