चायनामन कुलदीप यादव याने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या लढतीत खास विक्रमाला गवसणी घातली आहे. मुंबईतील वानखेडेच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना त्याने रायन रिकल्टनची विकेट घेत आयपीएलमध्ये शंभर विकेट्सचा टप्पा पार केला. त्याने ९७ सामन्यात हा डाव साधला आहे. भज्जीचा विक्रम मोडीत काढत तो जलदगतीने हा पल्ला गाठणारा चौथा भारतीय फिरकीपटू ठरलाय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कुलदीपनं साधला मोठा डाव, भज्जीला टाकले मागे
आयपीएलमध्ये सर्वात जलदगतीने १०० विकेट्स घेणाऱ्या फिरकीपटूंच्या यादीत अमित मिश्रा अव्वलस्थानी आहे. त्याने अवघ्या ८३ सामन्यात हा टप्पा पार केला होता. त्याच्यापाठोपाठ या यादीत वरुण चक्रवर्तीचा नंबर लागतो. त्यानेही ८३ सामन्यातच शंभरावी विकेट्स आपल्या खात्यात जमा केली होती. आयपीएलमध्ये २०० विकेट्स घेणारा एकमेव गोलंदाज युजवेंद्र चहल या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने १०० विकेट्स घेण्यासाठी ८४ सामने खेळले होते. त्यानंतर आता कुलदीप यादवचा नंबर लागतो. त्याने १०० सामन्यात १०० विकेट्स घेणाऱ्या भज्जीला मागे टाकले आहे.
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
आयपीएलमध्ये सर्वात जलदगतीने १०० विकेट्स घेणारे फिरकीपटू
- ८३ सामन्यात-अमित मिश्रा
- ८३ सामन्यात-वरुण चक्रवर्ती
- ८४ सामन्यात- युजवेंद्र चहल
- ९७ सामन्यात-कुलदीप यादव
- १०० सामन्यात - हरभजन सिंग
कुलदीप यादवची यंदाच्या हंगामातील कामगिरी
मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात कुलदीप यादवनं २२ धावा खर्च करून एक विकेट घेतली. यंदाच्या हंगामात १३ सामन्यात त्याने १३ विकेट्स घेतल्या आहेत. विकेट्सचा दुहेरी आकडा त्याने गाठला असला तरी अपेक्षित कामगिरी करण्यात तो अपयशी ठरल्याचे दिसून आले.