IPL 2025 : KL राहुल असेल DC चा आधार; कारण MI विरुद्ध लय भारीये त्याचा रेकॉर्ड

मुंबई इंडियन्सविरुद्ध लोकेश राहुलचा रेकॉर्ड हा एकदम जबरदस्त आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 03:52 IST2025-05-21T03:45:47+5:302025-05-21T03:52:47+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 MI vs DC 63rd Match Lokmat Player to Watch KL Rahul Delhi Capitals | IPL 2025 : KL राहुल असेल DC चा आधार; कारण MI विरुद्ध लय भारीये त्याचा रेकॉर्ड

IPL 2025 : KL राहुल असेल DC चा आधार; कारण MI विरुद्ध लय भारीये त्याचा रेकॉर्ड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 MI vs DC 63rd Match Player to Watch KL Rahul Delhi Capitals : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पहिल्या ट्रॉफीचं स्वप्न साकार करायचे असेल तर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला सर्वात आधी पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सला पराभूत करावे लागेल. संघाची नय्या पार करण्याची मोठी जबाबदारी ही लोकेश राहुलवर असेल. यंदाच्या हंगामात मध्यफळीत खेळताना दिसलेल्या लोकेश राहुलनं सलामीला फलंदाजीला येऊन धमक दाखवलीये. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद शतकी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सविरुद्ध लोकेश राहुलचा रेकॉर्ड हा एकदम जबरदस्त आहे. त्यामुळेच वानखेडेच्या मैदानात संघाला त्याच्याकडून आश्वासक खेळीची अपेक्षा असेल. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

KL राहुलचा MI विरुद्धचा रेकॉर्ड

लोकेश राहुलनं मुंबई इंडियन्स विरुद्ध आतापर्यंत खेळलेल्या १९ सामन्यात ७४.२३ च्या सरासरीने ९६५ धावा केल्या आहेत. ५०० पेक्षा अधिक धावा करताना कोणत्याही अन्य फ्रँयायझीच्या तुलनेत लोकेश राहुलची मुंबई इंडियन्स विरुद्धची सरासरी ही सर्वोत्तम आहे. एवढेच नाहीतर आयपीएलमधील ५ शतकांपैकी ३ शतके ही त्याने मुंबई इंडियन्स विरुद्ध झळकावली आहेत. या जबरदस्त रेकॉर्डमुळेच वानखेडेच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्ससाठी तो जमेची बाजू ठरु शकतो.

वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा

दीपक चाहरसमोर एकदाही फेकलेली नाही विकेट

मुंबई इंडियन्सकडून दीपक चाहर हा नव्या चेंडूवर  गोलंदाजी करतो. त्याच्याविरुद्धही केएल राहुल भारी खेळलाय. एकदाही केएल राहुलनं त्याच्यासमोर नांगी टाकलेली नाही. अर्थात या गोलंदाजाने एकदाही त्याची विकेट घेतलेली नाही. दीपक चाहर विरुद्ध १५९.५९ च्या स्ट्राइक रेटनं त्याने १५८ धावा काढल्याचा रेकॉर्ड आहे. ही आकडेवारी दिल्लीच्या ताफ्याला दिलासा देणारी अशी आहे. 

 KL राहुलची यंदाच्या हंगामातील कामगिरी

लोकेश राहुलनं यंदाच्या हंगामातील ११ सामन्यातील ११ डावात ६१.६३ च्या सरासरीसह १४८.०४ च्या स्ट्राइक रेटनं ३ अर्धशतके आणि एका शतकाच्या मदतीने ४९३ धावा केल्या आहेत. या कामगिरीत त्याने ४४ चौकारांसह २० षटकार मारल्याचे पाहायला मिळाले आहे. ५०० धावांचा टप्पा पार करण्यापासून तो फक्त ७ धावा दूर आहे. गुजरात टायटन्स विरुद्ध शतक झळकवण्याआधी लखनौ ५७ (४२),  आरसीबी ९३ (५३) आणि चेन्नई सुपर किंग्ज ७७(५१) या संघासमोर त्याने मोठी खेळी केल्याचे पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्स विरुद्ध त्याचा रेकॉर्ड भारी असला तरी यंदाच्या हंगामात घरच्या मैदानात चौथ्या क्रमांकावर खेळताना तो फक्त १३ चेंडूत १५ धावा करून बाद झाला होता.   
 

Web Title: IPL 2025 MI vs DC 63rd Match Lokmat Player to Watch KL Rahul Delhi Capitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.