Join us

आता काय बॉउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)

वानखेडेच्या मैदानात चेन्नई विरुद्धच्या सामन्यातही मुंबई इंडियन्सच्या फिल्डिंग वेळी रोहितचा डग आउटमधील एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 22:19 IST

Open in App

Rohit Sharma Reaction On Mitchell Santner Takes Catch  : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रोहित शर्मा बहुतांश सामन्यात फक्त बॅटिंगसाठीच मैदानात उतरताना दिसतोय. इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात तो बाराव्या खेळाडूच्या रुपात संघात असल्यामुळे फिल्डवर तो दिसत नाही. पण मुंबई इंडियन्सची फिल्डिंग असली की, तो या ना त्या कारणामुळे पिक्चरमध्ये येतोच. डग आउटमध्ये बसून मॅच फिरवल्यापासून ते बुमराह आणि करुण नायर यांच्यातील मैदानातील भांडणावेळी  मजा घेताना तो स्पॉट झाला होता. त्या गोष्टीची चर्चाही रंगली. आता वानखेडेच्या मैदानात चेन्नई विरुद्धच्या सामन्यातही मुंबई इंडियन्सच्या फिल्डिंग वेळी रोहितचा डग आउटमधील एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. 

बॅटिंगसाठी मैदानात उतरण्याआधी रोहितनं डग आउटमधील रिअ‍ॅक्शनसह लुटली मैफिल

चेन्नईच्या डावातील सातव्या षटकात दीपक चाहरच्या पाचव्या चेंडूवर CSK चा युवा फलंदाज आयुष म्हात्रे याने मोठा फटका खेळला. त्याचा हा प्रयत्न फसवा ठरला. मिचेल सँटनर याने सीमारेषेच्या अगदी जवळ त्याचा कॅच पकडला. हा कॅच घेताना मिचेल सँटनर थोडा ढगमगला.  यावेळी डग आउटमध्ये बसलेल्या रोहित शर्माची रिअ‍ॅक्शन बघण्याजोगी होती. आरे थांब थांब...आता काय बॉउंड्री लाइनच्या बाहेर येतोस काय? अशा तोऱ्यात रोहित सँटनरला सावरण्याचा इशारा करताना दिसून आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

आयुष म्हात्रेचे दमदार पदार्पण, शिवम दुबे अन् जड्डूचीही बॅट तळपली

चेन्नई सुपर किंग्जकडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या १७ वर्षीय आयुष म्हात्रेनं मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात १५ चेंडूत ३२ धावांची जबरदस्त खेळी केल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या खेळीशिवाय रविंद्र जडेजा ५३ (३५) आणि शिवम दुबे ५० (३२) यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने निर्धारित २० षटकात ५ बाद १७६ धावा केल्याचे पाहायला मिळाले.  

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सरोहित शर्माव्हायरल व्हिडिओइंडियन प्रीमिअर लीग