Ruturaj Gaikwad MS Dhoni Captaincy, IPL 2025 CSK vs DC: मराठमोळा ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आणि त्याच्या जागी महेंद्रसिंग धोनी कर्णधार झाला. धोनीच्या अनुभवाच्या जोरावर चेन्नईला गतवैभव प्राप्त होईल अशी अनेकांची आशा होती. पण कोलकाता विरूद्ध शुक्रवारच्या सामन्यात CSK ने अजूनच वाईट कामगिरी केली. चेन्नईने केवळ १०३ धावा केल्या आणि कोलकाताने १० षटकांत ते आव्हान पार केले. या सामन्यात 'धोनी मॅजिक' चालली नाही. तशातच एका व्हायरल व्हिडीओने विविध चर्चांना उधाण आले.
व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे IPL बाहेर पडल्याने महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा चेन्नईचा कर्णधार बनला. या घोषणेनंतर काही वेळातच सोशल मीडियावर ऋतुराजचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे तो खरेच जखमी आहे की त्याच्या माघारीमागे धोनीला नेतृत्व सोपविणे हे एक कारण आहे, अशी कुजबूज सुरु झाली.
एका चाहत्याने ऋतुराज चेपॉकवर फुटबॉल खेळतानाचा व्हिडीओ पोस्ट केला. त्याच्या हातावर कोणतीच पट्टी दिसली नाही. त्यामुळे या माघारीमागे शंका उपस्थित केली जात आहे. पाहा व्हिडीओ-
डगआऊटमधून पाठिंबा देत राहणार...
ऋतुराज आयपीएलमधून बाहेर झाला असला, तरी तो संघासोबत असणार आहे. तो म्हणाला, 'हॅलो, ऋतुराज बोलतोय. दुर्दैवाने झालेल्या कोपराच्या दुखापतीमुळे उर्वरित सामन्यांना मुकावे लागणार असल्याने खूप वाईट वाटत आहे. पण, आत्तापर्यंत तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद. आम्ही सध्या संघर्ष करीत आहोत; पण आता तरुण यष्टिरक्षक (एमएस धोनी) संघाचे नेतृत्व करणार आहे. आशा आहे की, काही गोष्टी बदलतील. मी संघासोबत आहे.' कोपराच्या दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड आयपीएलमधून बाहेर झाला आहे अशी माहिती संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी दिली.
Web Title: IPL 2025 Marathi cricketer Ruturaj Gaikwad sacrificed for MS Dhoni captaincy in CSK Viral video sparks discussion CSK vs KKR
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.