इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा झाला असतानाही २७ कोटी प्राइज टॅगसह मिरवणाऱ्या रिषभ पंतचा फ्लॉप शो कायम आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात पॅट कमिन्सनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर लखनौच्या संघाकडून मिचेल मार्श आणि एडन मार्करम या जोडीनं संघाच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी अर्धशतकी खेळीसह पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी करत संघाला दमदार सुरुवात करुन दिली. मिचेल मार्शच्या रुपात लखनौला पहिला धक्का बसला. पहिली विकेट गमावल्यावर कर्णधार रिषभ पंत मैदानात आला. पण चांगला प्लॅटफॉर्म सेट असताना तो पुन्हा अपयशी ठरला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
निकोलस पूरन आधी बॅटिंगला आला पंत, पण...
लखनौच्या ताफ्यातून मिचेल मार्श आणि मार्करम जोडी डावाची सुरुवात करते. त्यानंतर निकोलस पूरन बॅटिंगला येतो. पण या सामन्यात पंतने स्वत: बढती घेतली. तो पूरनच्या आधी आला पण खराब फॉर्मने त्याची पाठ काही सोडली नाही. ६ चेंडूत ७ धावा करून तो तंबूत परतला. श्रीलंकन इशान मलिंगा याने आपल्याच गोलंदाजीवर उत्तम झेल टिपत पंतचा खेळ खल्लास केला.
RCB नं केली MI ची बरोबरी, पण... यंदा टॉपरसह सर्वाधिक वेळा प्लेऑफ्स खेळणारे ३ संघ ठरले फेल
LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी फिरवली पाठ
ज्याच्यावर २७ कोटींची विक्रमी बोली लावली त्या गड्याचा आणखी एक फ्लॉप शो बघून संजीव गोयंका पुन्हा एकदा निराश झाल्याचे पाहायला मिळाले. लखनौच्या प्रत्येक सामन्यावेळी ते स्टँडमध्ये उपस्थितीत असल्याचे पाहायला मिळते. पंतची विकेट पडल्यावर त्यांचा मूड ऑफ झाला. बाल्कनीत उभे असलेले संजीव गोयंका बाल्कनीतून बाहेर पडताना पाहायला मिळाले. पंतच्या निराशजनक कामगिरीनंतर त्यांनी पुन्हा एकदा त्याच्याकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. याआधीही पंतच्या विकेटनंतर सींजीव गोयंका चर्चेत राहिले आहेत. हाच तेच दृश्य पुन्हा एकदा पाहायला मिळाले.
११ सामन्यातील १० डावात फक्त एक फिफ्टी
रिषभ पंत हा आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. लखनौच्या संघाने त्याच्यासाठी तब्बल २७ कोटी रुपये मोजले आहेत. पण या गड्याने ११ सामन्यातील १० डावात फक्त एक अर्धशतक झळकावले आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात ४९ चेंडूत केलेल्या ६३ धावांच्या खेळीशिवाय प्रत्येक सामन्यात तो स्वस्तात आटोपल्याचे पाहायला मिळाले आहे.