Join us

IPL 2025 : ३०० पारच्या नादात SRH 'बरबाद'; या तिघांनी १-२ मोठ्या खेळीसह तलवार केली म्यान

एक नजर SRH च्या ताफ्यातील फुसका बार ठरलेल्या फलंदाजांवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 14:52 IST

Open in App

IPL 2025 LSG vs SHR 61st Match Player to Watch Abhishek Sharma Ishan Kishan Travis Head Sunrisers Hyderabad : गत उपविजेत्या सनरायझर्स हैदराबाद संघाने यंदाच्या हंगामाची सुरुवात अगदी तोऱ्यात केली. राजस्थान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात इशान किशनच्या भात्यातील शतकी खेळी आणि ट्रॅविस हेडच्या अर्धशतकाच्या जोरावर संघाने पहिल्याच सामन्यात धावफलकावर २८६ धावा लावल्या. त्यानंतर अभिषेक शर्माच्या भात्यातूनही शतक आले. मग तगडी बॅटिंग ऑर्डर असलेला SRH संघ आयपीएलच्या इतिहासात ३०० धावासंख्ये उभारणारा पहिला संघ ठरेल, अशी चर्चाही रंगली. पण या नादात संघ 'बरबाद' झाला. प्लेऑफ्सआधीच त्यांचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. ज्या भिडूंच्या जोरावर ते ३०० पारचा पल्ला गाठतील, असे वाटत होते त्या स्फोटक फलंदाजांनी एक-दोन मोठ्या खेळीनंतर तलवार म्यान केली. एक नजर SRH च्या ताफ्यातील फुसका बार ठरलेल्या फलंदाजांवर 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

इशानचा शानदार शो फक्त एका सेंच्युरीवर थांबला

इशान किशन याने आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिल्याच सामन्यात शतकी खेळीसह शानदार सुरुवात केली. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने ४७ चेंडूत १०६ धावांची खेळी केली. पण त्यानंतर मात्र तो सातत्याने अपयशी ठरताना दिसले. १० पैकी ६ सामन्यात त्याला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. 

IPL 2025 : आता प्रत्येक लढत 'करो या मरो'ची! LSG च्या ताफ्यातील या तिघांवर असेल मोठी जबाबदारी

अभिषेक शर्माच्या कामगिरीतही सातत्याचा अभाव दिसला

आयपीएलच्या पहिल्या पाच सामन्यातील फ्लॉप शोनंतर अभिषेक शर्मानं पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात विक्रमी शतक झळकावले. ५५ चेंडूतील १४१ धावांच्या खेळीसह भारताकडून आयपीएलमध्ये वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केला. पण त्याच्या कामगिरीतही सातत्याचा अभावा दिसून आले. मुंबई इंडियन्स विरुद्धची २८ चेंडूतील ४० धावांची खेळी आणि गुजरात टायटन्सविरुद्ध ४१ चेंडूतील ७४ धावा वगळता त्याची बॅट काही तळपली नाही. 

हेन्री क्लासेनच्या खात्यात फक्त एक अर्धशतक

हेन्री क्लासेन हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या रक्कमेसह रिटेन करण्यात आलेला खेळाडू आहे. पण यंदाच्या हंगामात १० सामन्यात त्याच्या भात्यातून फक्त एक अर्धशतक आले. काही खेळीत त्याने उपयुक्त खेळी केली. पण त्याच्याकडून जी अपेक्षा संघाला होती त्यात तो कमीच पडला. मुंबई इंडियन्स विरुद्ध ४४ चेंडूत केलेली ७१ धावा ही त्याची यंदाच्या स्पर्धेतील एकमेव सर्वोत्तम खेळी ठरली.  

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५सनरायझर्स हैदराबादलखनौ सुपर जायंट्सइशान किशनइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट