Greatest Relay Catch Of IPL : प्रितीच्या संघाविरुद्ध "हार कर जीतने वाले दो बाजीगर" (VIDEO)

ज्या चेंडूवर ६ धावा मिळतील वाटत होते त्यावर विकेट मिळाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 00:15 IST2025-04-02T00:09:44+5:302025-04-02T00:15:12+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 LSG vs PBKS Greatest Relay Catch Of IPL Ravi Bishnoi And Badoni Pull Off Unimaginable Effort On Boundary Line Watch Video | Greatest Relay Catch Of IPL : प्रितीच्या संघाविरुद्ध "हार कर जीतने वाले दो बाजीगर" (VIDEO)

Greatest Relay Catch Of IPL : प्रितीच्या संघाविरुद्ध "हार कर जीतने वाले दो बाजीगर" (VIDEO)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Greatest Relay Catch Of IPL Ravi Bishnoi And Badoni Unimaginable Effort : लखनौैच्या मैदानात रंगलेला सामना हा पंजाब किंग्जच्या संघानं जिंकला. पण प्रिती झिंटाच्या सह मालकीच्या संघासमोर नबावांच्या ताफ्यात "हार कर जीतने वाले दो बाजीगर" लक्षवेधी ठरले. धावांचा पाठलाग करताना पंजाबचा सलामीवीर प्रभसिमरन सिंग याने तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश केला. त्याची सुंदर  खेळी एका अप्रतिम झेलमुळे संपुष्टात आली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!


बिश्नोई अन् बडोनी जोडीची कमाल, अप्रतिम क्षेत्ररक्षण अन् तितकाच सुंदर झेल

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सीमारेषेवरील सर्वोत्तम रिले कॅचसह पंजाबी पठ्ठ्याच्या दमदार खेळीला ब्रेक लागला. लखनौच्या ताफ्यातील युवा खेळाडू आयुष बडोनीनं जवळपास ६ धावांसाठी सीमारेषेबाहेर जाणारा चेंडू सुपरमॅनच्या तोऱ्यात उडी मारून सीमारेषेच्या आत ढकला. याच वेळी पहिल्या पासून चेंडूवर नजर ठेवून असलेल्या रवी बिश्नोईन पाण्यात सूळ मारावी तशी झेप घेत एक अविश्वसनीय झेल टिपला.  

IPL 2025 LSG vs PBKS : हा तर घाट्याचा सौदा! २७ कोटींच्या पंतनं ३ सामन्यात २७ धावा नाही काढल्या

११ व्या षटकात प्रभसिमरन याने मोठा फटका खेळला अन्....

पंजाबच्या डावातील ११ व्या षटकात प्रभसिमरन सिंग ६९ धावांवर खेळत होता. दिग्वेश राठी घेऊन आलेल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर प्रभसिमरन याने मोठा फटका मारला. हा चेंडू त्याला आरामात ६ धावा देऊन जाईल, असेच वाटत होते. पण आयुष बडोनी याने जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवून देत झेल घेण्याचा प्रयत्न केला. चेंडू हातात ठेवला तर ६ धावा गेल्या हे लक्षात येताच  त्याने स्वत: सीमारेषेबाहेर  जाण्याआधी चेंडू मैदानात ढकलला. हे सगळं घडत होतं त्यावर बिश्नोईची अगदी बारकाईनं  नजर होती अन् त्याने स्वत:ला जमिनीवर  झोकून देत अप्रतिम झेल टिपला.

ज्या चेंडूवर ६ धावा मिळतील वाटत होते त्यावर विकेट मिळाली

ज्या चेंडूवर सहा धावा मिळतील, असे वाटत होते त्या चेंडूवर या जोड गोळीच्या जबरदस्त क्षेत्रक्षणामुळे लखनौ संघाला विकेट मिळाली. या विकेटचा लखनौला विजय मिळवण्यासाठी काहीच फायदा झाला नाही, पण बडोनी आणि बिश्नोई जोडी मात्र प्रितीच्या संघासमोर  "हार कर जीतने वाले दोन बाजीगर" असं म्हणायला लावणारी होती.

Web Title: IPL 2025 LSG vs PBKS Greatest Relay Catch Of IPL Ravi Bishnoi And Badoni Pull Off Unimaginable Effort On Boundary Line Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.