IPL 2025 LSG vs PBKS 13th Match Lokmat Player to Watch Yuzvendra Punjab Kings : युजवेंद्र चहल हा गेल्या काही दिवसांपासून फिल्डवरील कामगिरीशिवाय फिल्डबाहेरील गोष्टींमुळेच अधिक चर्चेत राहिला. टीम इंडियातून बाहेरस्ता रस्ता अन् गोडी गुलाबीच्या संसारात पडलेला मिठाचा खडा या सारख्या नकारात्मक गोष्टी घडत असताना दुसऱ्या बाजूला मेगा लिलावात त्याला मोठी लॉटरली लागली. टीम इंडिया बाहेर असतानाही मेगा लिलावात पंजाब किंग्जच्या संघानं मोठी रक्कम मोजत त्याला आपल्या ताफ्यात घेतले आहे. गेल्या काही दिवसांत डावखुऱ्या भारतीय फिरकीपटूच्या आयुष्यातील ही एक चांगली अन् सकारात्मक घटना आहे. आता तो पुन्हा एकदा आपल्या फिरकीची जादू दाखवण्यासाठी मैदानात उतरेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
... अन् IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा फिरकीपटू
आयपीएलमध्ये धडाकेबाज फलंदाजांसह अष्टपैलू क्रिकेटर्सच्या गर्दीत फारच कमी गोलंदाजांना मोठा भाव मिळतो. गत हंगामात मिचेल स्टार्क (२४.७५ कोटी) आणि पॅट कमिन्स (२०.५० कोटी) या परदेशी गोलंदाजांवर ऐतिहासिक बोली लागल्याचे पाहायला मिळाले. पण २०२५ च्या हंगामात चहलनं लक्षवेधून घेतले. १८ कोटी प्राइज टॅगसह तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा फिरकीपटू ठरला. यंदाच्या हंगामात पंजाब किंग्जच्या ताफ्यातील तो प्रमुख खेळाडू असून तो आपली छाप सोडणार का? ते पाहण्याजोगे असेल.
IPL 2025 GT vs PBKS : श्रेयस अय्यरच्या खांद्यावर प्रीतीसह पंजाबच्या 'स्वप्नांचे ओझे'
IPL स्पर्धेतील पहिला अन् आतापर्यंतचा एकमेव 'द्विशतकवीर'
२०१३ पासून आयपीएलच्या मैदानात दिसणारा युजवेंद्र चहल मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स या फ्रँचायझीकडून खेळून पंजाबच्या ताफ्यात आलाय. आतापर्यंत १६१ सामन्यात त्याने २०५ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. आयपीएलमध्ये २०० विकेट्स घेणारा तो पहिला अन् आतापर्यंतचा एकमेव गोलंदाज आहे. ही आकडेवारी त्याच्यातील सर्वोच्च क्षमता दाखवून देणारी आहे. २०२२ च्या हंगामात IPL कारकिर्दीतील सर्वोच्च कामगिरी नोंदवताना त्याने पर्पल कॅपही पटकावली होती. यंदाच्या हंगामात तो पंजाबच्या ताफ्यातून लक्षवेधी छाप सोडणार का? ते पाहण्याजोगे असेल.
आयपीएलआधी चार महिन्यापूर्वी देशांतर्गत टी-२० स्पर्धेत केलीये सर्वोच्च कामगिरी
बऱ्याच दिवसांपासून टीम इंडिया बाहेर असलेल्या चहल आयपीएलआधी मागील वर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये हरयाणाकडून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील ७ सामन्यात त्याने १० विकेट्स घेतल्या होत्या. २३ नोव्हेबर २०२४ रोजी वानखेडेच्या मैदानात मणिपूर विरुद्ध ९ धावा खर्च करून घेतलेल्या ४ विकेट्स ही त्याची मागील १० टी-२० सामन्यातील सर्वोच्च कामगिरी आहे. यंदाच्या हंगामाच्या पहिल्या सामन्यात त्याने ३ षटके गोलंदाजी केली. पण त्याला विकेटच खाते उघडता आले नव्हते.
Web Title: IPL 2025 LSG vs PBKS 13th Match Lokmat Player to Watch Yuzvendra Punjab Kings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.