IPL 2025 LSG vs PBKS Digvesh Rathi's fiery send-off to Priyansh Arya : लखनौ सुपर जाएटंस विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील लढतीत कधीकाळी एका संघाकडून खेळणाऱ्या दोन युवा खेळाडूंमध्ये नवी जंग सुरु झाल्याचा एक सीन पाहायला मिळाला. लखनौच्या संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाब किंग्जसमोर १७२ धावांचे टार्गेट सेट केले. या धावांचा पाठलाग करताना पंजाब संघाकडून प्रियंश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी डावाची सुरुवात केली. पदार्पणाच्या सामन्यात तुफान फटकेबाजीची झलक दाखवून देणारा प्रियांश दुसऱ्या सामन्यात अवघ्या ८ धावांवर तंबूत परतला. लखनौच्या ताफ्यातील दिग्वेश राठीनं त्याची विकेट घेतली. या विकेटचे सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हटके अंदाजातील सेलिब्रेशनची चर्चा
दिग्वेश राठीनं विकेट घेतल्यावर हटके अंदाजात सेलिब्रेशन केले. तुझी विकेट माझ्या खात्यात जमा झालीये, ती मी लिहून ठेवतोय असे हातवारे करुन दाखवत दिग्वेश राठीनं विकेट्सचा आनंद साजरा केला. ही कृती त्याने प्रियांशच्या अगदी पुढ्यात जाऊन केली. हा सीन आयपीएलमुळे दोन सहकाऱ्यांमध्ये आता नव्या युद्धाची सुरुवात झालीये, असे दृश्य दाखवून देणारे होते.
IPL 2025 LSG vs PBKS : हा तर घाट्याचा सौदा! २७ कोटींच्या पंतनं ३ सामन्यात २७ धावा नाही काढल्या
आयपीएल आधी एकाच संघाकडून खेळताना दिसलीये ही जोडी, पण आता
दिग्वेश राठी आणि प्रियांश आर्य हे दोघे आयपीएलमध्ये वेगवेगळ्या फ्रँयायझीमधून खेळत आहेत. पण दिल्ली प्रीमियर लीगमध्ये दोघे एकाच संघाकडून खेळताना दिसले होते. पण आयपीएल खेळताना दोस्त दोस्त ना रहा ...ओ प्यार ना रहा...असं काहीसं गाण दिग्वेश राठीनं आपल्या सेलिब्रेशनमधून गायल्याचे दिसून आले.
Web Title: IPL 2025 LSG vs PBKS 13th Match Digvesh Rathi's fiery send-off to Priyansh Arya From DPL teammates to IPL rivals Celebration
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.