IPL 2025 LSG vs MI Who is Raj Bawa Indian All Rounder Making His Mumbai Indians Debut : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील १६ व्या सामन्यात लखनौ सुपर जाएंट्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाकडून आणखी एका नव्या चेहऱ्याला पदार्पणाची संधी देण्यात आली. दुखापतीमुळे रोहित शर्माच्या जागी राज अंगद बावा याला संघात स्ंधी देण्यात आली. एक नजर टाकुयात कोण आहे राज अंगद बावा ज्याला मुंबई इंडियन्सकडून मिळालीये पदार्पणाची संधी यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय अंडर १९ वर्ल्ड कप विजेत्या संघाचा हिरो
राज अंगद बावा अनकॅप्ड भारतीय खेळाडू आहे. हा डावखुऱ्या हाताने फलंदाजीसह उजव्या हाताने मध्यम जलगती गोलंदाजी करणारा एक अष्टपैलू खेळाडू आहे. २०२२ मध्ये १९ वर्षाखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा तो भाग होता. १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात राज बावानं इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात पाच विकेट्स घेत भारतीय संघाला जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
Jasprit Bumrah Fitness : IPL मधील आणखी किती मॅचेसला मुकणार जसप्रीत बुमराह? मोठी माहिती आली समोर
राज बावाची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी
२२ वर्षीय अष्टपैलू खेळाडूने आतापर्यंतच्या कारकिर्दीत २० टी-२० सामन्यांशिवाय ११ प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए सामने खेळले आहेत. यात प्रथम श्रेणी सामन्यात त्याच्या नावे एका शतकाचीही नोंद आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने दोन वेळा चार विकेट्स घेण्याची कामगिरी नोंदवली आहे.
MI कडून पदार्पणाआधी या संघाकडून केलं आयपीएल पदार्पण
१९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेत छाप सोडल्यावर २०२२ च्या मेगा लिलावात पंजाब किंग्ज फ्रँचायझी संघानं २ कोटी रुपये मोजत या अनकॅप्ड खेळाडूला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. २ हंगामात त्याला फक्त २ सामन्यातच संधी मिळाली. यात त्याच्या नावे २ डावात ११ धावाच करता आल्या होत्या. आयपीएल २०२५ च्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघानं ३० लाख रुपयांसह त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. मुंबई इंडियन्सकडून तो छाप सोडणार का? ते पाहण्याजोगे असेल.
Web Title: IPL 2025 LSG vs MI Who is Raj Angad Bawa Indian All Rounder Making His Mumbai Indians Debut Place Of Rohit Sharma
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.