Join us

LSG vs MI : महागडा पंत पुन्हा स्वस्तात तंबूत परतला; संघ मालक संजीव गोएंका यांची रिअ‍ॅक्शन चर्चेत

आयपीएलच्या इतिहासातील महागड्या खेळाडूच्या फ्लॉप शोचा सिलसिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 21:10 IST

Open in App

IPL 2025 LSG vs MI : आयपीएलच्या १८ व्या हंगामात लखनौ सुपर जाएंट्सचा कर्णधार रिषभ पंत याच्या फ्लॉप शोचा सिलसिला मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यातही कायम राहिला. या सामन्यातही एक षटक खेळून तो २ धावा करून तंबूत परतला. मिचेल मार्शनं संघाला जबरदस्त सुरुवात करून दिल्यावर अगदी चांगला प्लॅटफॉर्म सेट असताना तो मैदानात फलंदाजीसाठी उतरला होता. पण हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर तो फसला. रिषभ पंतची विकेट पडल्यावर स्टँडमध्ये सामना पाहण्यासाठी उपस्थितीत संघ मालक संजीव गोएंका यांची रिअ‍ॅक्शन बघण्याजोगी होती. पंतच्या विकेटनंतर त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव दाखणारा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पंतच्या विकेटनंतर संघ मालक संजीव गोएंका यांची रिअ‍ॅक्शन चर्चेत

निकोलस पूरनच्या रुपात लखनौच्या संघानं ९१ धावांवर दुसरी विकेट गमावल्यावर ९ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर पंत फलंदाजीसाठी मैदानात उतरला. ११ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर हार्दिक पांड्याच्या चेंडूवर तो फसला अन् झेलबाद होऊन परतला. त्याची विकेट पडल्यावर कॅमेरा संघ मालक संजीव गोएंका यांच्यावर फिरला. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य  दिसले. एवढेच नाही तर हसत हसत ते आपल्या शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीशी काहीतरी बोलतानाही स्पॉट झाले. आता स्टँडमध्ये नेमकं काय विनोद झाला की पंतची विकेट हाच एक विनोद होता? हा मुद्दा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. 

Raj Angad Bawa : कोण आहे राज बावा? वर्ल्ड चॅम्पियन झाल्यावर २ कोटींचा प्राइज टॅग; MI नं फक्त ३० लाखांत केला...

रिषभ पंतची आयपीएलमधील कामगिरी; चार सामन्यात एकदाच गाठला दुहेरी आकडा

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू असलेल्या रिषभ पंतची यंदाच्या हंगामाची सुरुवातच खराब झाली. पहिल्याच सामन्यात एक षटक खेळून तो शून्यावर बाद झाला होता. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या या सामन्यानंतर तरी तो फलंदाजीतील आपली धमक दाखवेल, अशी आशा होती. पण दुसऱ्या सामन्यात त्याच्यावर १५ चेंडूत १५ धावा करून तंबूत परतण्याची वेळ आली. त्यानंतर दोन सामन्यात तो प्रत्येकी २-२ धावा करून तंबूत परतल्याचे पाहायला मिळाले.  

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५रिषभ पंतलखनौ सुपर जायंट्समुंबई इंडियन्सहार्दिक पांड्या