Join us

IPL 2025 LSG vs MI : पांड्याच्या यशात रोहितचा वाटा; स्ट्रॅटेजिक टाइम आउटमध्ये काय घडलं? (VIDEO)

. इथं जाणून घेऊयात हार्दिक पांड्याच्या यशात बाकावर बसलेल्या रोहित शर्मानं कसा उचलला वाटा यासंदर्भातील खास स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 22:55 IST

Open in App

IPL 2025 LSG vs MI  Rohit Sharma's Valuable Tips To Hardik Pandya Viral Video : लखनौच्या इकाना स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराने इतिहास रचला. हार्दिक पांड्याने जबरदस्त गोलंदाजी करताना पाच विकेट्सचा डाव साधला. हार्दिक पांड्याने पूरनच्या रुपात या सामन्यात पहिली विकेट घेतली. या विकेटसाठी त्याला दुखापतीमुळे बाकावर बसण्याची वेळ आलेल्या रोहितचा मंत्र कामी आला. सोशल मीडियावर सध्या हा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. इथं जाणून घेऊयात हार्दिक पांड्याच्या यशात बाकावर बसलेल्या रोहित शर्मानं कसा उचलला वाटा यासंदर्भातील खास स्टोरी

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

हार्दिक पांड्याच्या यशात रोहितचा वाटा लखनौ सुपर जाएंट्स विरुद्धच्या सामन्यात गुडघ्याच्या दुखापतीमुळे रोहित शर्मावर सामन्याला मुकण्याची वेळ आली. तो संघाबाहेर असला तरी मॅचमध्ये तो संघासोबत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.  मिचेल मार्शनं तगडी फलंदाजी केल्यावर मुंबई इंडियन्सच्या संघातील खांदे पडले होते. लखनौच्या डावातील स्ट्रॅटेजिक टाइम आउटमध्ये रोहित मैदानात आला. तो हार्दिक पांड्यासह अन्य गोलंदाजांना सल्ला देताना दिसला. त्यानंतर लगेच हार्दिक पांड्याने निकोलस पूरनच्या रुपात पहिली विकेट आपल्या खात्यात जमा केली. रोहितनं कानमंत्र दिला अन् पांड्याच्या खात्यात मोठी विकेट जमा झाली. सोशल मीडियावर बाकावर बसलेल्या रोहिच्या मास्टर माइंडची गोष्ट चर्चेचा विषय ठरत आहे. निकोलस पूरनच्या विकेटमागे रोहितचा हात आहे, अशी चर्चा रंगू लागली आहे.

LSG vs MI : महागडा पंत पुन्हा स्वस्तात तंबूत परतला; संघ मालक संजीव गोएंका यांची रिअ‍ॅक्शन चर्चेत

स्ट्रॅटेजिक टाइम आउटमध्ये रोहित इन; मग पांड्यानं लगेच पूरनला केलं 'आउट' हार्दिक पांड्याने निकोल पूरनला अवघ्या १२ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. निकोलस पूरन सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. २०० पेक्षा अधिक धावांसह ऑरेंज कॅपही त्याच्याकडे आहे. तो मुंबई इंडियन्स विरुद्धही त्याने आक्रमक अंदाजात सुरुवात केली होती. मैदानात उतरल्यावर दुसऱ्याच चेंडूवर त्याने षटकार मारत खाते उघडले होते. स्ट्रॅटेजिक टाइम आउटमध्ये रोहित मैदानात आला अन् त्यानंतर तिसऱ्या षटकातच पूरन मैदानाबाहेर गेला.  

हार्दिकचा पंजा, लखनौनं घरच्या मैदानावर पहिल्यांदाच गाठला २०० धावांचा आकडा

हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. दुसरीकडे लखनौच्या संघाकडून मिचेल मार्श ६० (३१) आणि मार्करम ५३ (३८) यांनी केलेल्या अर्धशतकी खेळीनंतर अखेरच्या षटकात आयुष बडोनी ३० (१९) आणि डेवि़ड मिलर २७ (१४) यांनी केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या मोबदल्यात धावफलकावर २०३ धावा लावल्या. घरच्या मैदानावर लखनौनं पहिल्यांदाच दोनशे धावसंख्या उभारल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५मुंबई इंडियन्सलखनौ सुपर जायंट्सरोहित शर्माहार्दिक पांड्याव्हायरल व्हिडिओ