IPL 2025 LSG vs MI 16th Match Player to Watch Prince Yadav Lucknow Super Giants : आयपीएलच्या प्रत्येक हंगामात नव्या चेहऱ्यांची झलक पाहायला मिळत असते. यंदाच्या हंगामात रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ संघातून प्रिन्स यादव हा आणखी एक लक्षवेधी चेहरा चर्चेत आला. त्याने आपल्या दुसऱ्या आयपीएल सामन्यात पहिली विकेट घेताना स्फोटक फलंदाज ट्रॅविस हेडची शिकार केली. कोणत्याही गोलंदाजासाठी ट्रॅविस हेडची विकेट ही खास असते. त्यात प्रिन्सनं तर आयपीएलमधील आपलं खातं त्याच्या विकेटनं उघडलंय. त्यामुळे लखनौच्या ताफ्यातील हा गडी यंदाचे हंगाम गाजवण्यास तयार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ट्रॅविस हेडच्या रुपात IPL मधील पहिली विकेट घेत केली हवा
लोकल टी-२० लीग अन् देशांतर्गत क्रिकेटमध्ये खास छाप सोडून आयपीएलमध्ये एन्ट्री मारणाऱ्या प्रिन्स यादव हा मध्यम जलदगती गोलंदाजीसह फलंदाजीमध्ये उपयुक्त ठरेल, असा खेळाडू आहे. गोलंदाजी शैलीतील बदलासह चेंडूच्या गतीमध्ये कमालीचे मिश्रण करून प्रतिस्पर्धी फलंदाजाला चकवा देण्यात तो माहिर आहे. त्यामुळेच यंदाच्या हंगामात लखनौच्या ताफ्यातून त्याला अधिकाधिक संधी मिळताना दिसू शकते. ट्रॅविस हेडची विकेट घेतल्यावर तर त्याचे मूल्य आणखीन वाढेल. पण तुम्हाला माहितीये का? आयपीएलमध्ये ट्रॅविस हेडची विकेट घेऊन हवा करणारा प्रिन्स यादवच्या नावे टी-२० क्रिकेटमध्ये हॅटिट्रिकचीही नोंद आहे.
IPL 2025 : मिस्टर IPL ची कार्बन कॉपी! MI च्या ताफ्यातील गडी रिव्हर्स स्वीप-स्कूप शॉट्सही मारतो भारी
प्रिन्सच्या नावे हॅटट्रिकचाही रेकॉर्ड
आयपीएलमध्ये खेळण्याआधी तो दिल्ली प्रीमियर लीगमध्ये पुरानी दिल्ली ६ या संघाकडून पंतच्या नेतृत्वाखाली खेळताना पाहायला मिळाले होते. या लोकल लीगमधील दमदार कामगिरीच्या जोरावरच त्याच्यासाठी आयपीएलचे दरवाजे उघडले. या स्पर्धेत त्याने सेंट्रल दिल्ली किंग्ज विरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिकचा डाव साधला होता. या लोकल लीगमध्ये हॅटट्रिकची किमया साधणारा तो पहिला गोलंदाजही आहे.
प्रिन्सची देशांतर्गत क्रिकेटमध्ये व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये लक्षवेधी कामगिरी
दिल्ली प्रीमियर लीगमधील कामगिरीशिवाय देशांतर्गत क्रिकेटमधील व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये त्याने खास छाप सोडलीये. २०२४-२५ च्या हंगामातील विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत त्याने दिल्लीकडून सर्वाधिक ११ विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले. रणजी स्पर्धेत त्याला दोन सामन्यात संधी मिळाली. पण रेड बॉल क्रिकेटमध्ये तो फक्त एकच विकेट घेऊ शकला. याउलट व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये ६ लिस्ट ए मॅचेस आणि ८ टी-२० सामन्यात त्याच्या खात्यात प्रत्येकी ८-८ विकेट्स जमा आहेत.
Web Title: IPL 2025 LSG vs MI 16th Match Lokmat Player to Watch Prince Yadav Lucknow Super Giants
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.