KL Rahul Record Fastest 5000 Runs In IPL इंडियन प्रीमियर लीगच्या ४० वा सामना दिल्ली कॅपिटल्स संघाला एकहाती मॅच जिंकून देणाऱ्या केएल राहुलसाठी खास ठरला. दिल्ली विरुद्ध लखनौ यांच्यातील लढत लोकेश राहुलसाठी आत्म सन्मानाची लढाई असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगल्याचे पाहायला मिळाले. गत हंगामात तो लखनौच्या संघाचे नेतृत्व करताना दिसला होता. यावेळी कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करत भर मैदानात LSG संघ मालकाने केलेल्या अपमानाचा तो बदला घेणार का? अशी चर्चाही रंगल्याचे पाहायला मिळाले. लोकेश राहुलनं आपल्या बॅटिंगमधील क्लास दाखवत ही लढाई जिंकलीच. पण जुन्या संघाविरुद्ध दिमाखदार कामगिरी करताना त्याने नवा इतिहासही रचला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सर्वात जलगतीने गाठला ५ हजार धावसंख्येचा टप्पा
आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलदगतीने ५ हजार धावा करण्याचा विक्रम आता लोकेश राहुलच्या नावे झाला आहे. लोकेश राहुल हा आयपीएलमध्ये पाच हजार धावा करणारा आठवा खेळाडू ठरलाय. याआधी विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, डेविड वॉर्नर, सुरेश रैना, एमएस धोनी आणि एबी डिविलियर्स यांनी हा पल्ला गाठला आहे.
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
डेविड वॉर्नरचा विक्रम मोडीत काढत केएल राहुलनं रचला इतिहास
लखनौच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात लोकेश राहुलनं ऑस्ट्रेलियन स्टार क्रिकेटर डेविड वॉर्नरचा विक्रम मोडीत काढत आयपीएलमध्ये सर्वात जलद ५ हजार धावा करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला. डेविड वॉर्नरनं २०२० च्या हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना अबू धाबीच्या मैदानात रंगलेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात वॉर्नरनं १३५ डावात ५००० धावांचा पल्ला गाठला होता. केएल राहुलनं १३० डावात हा पल्ला गाठत IPL मध्ये नवा इतिहास रचला आहे.
किंग कोहली तिसऱ्या स्थानी
आयपीएलमध्ये सर्वात जलदगतीने ५००० धावांचा टप्पा गाठणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडमवर मुंबइ इंडियन्स विरुद्ध खेळताना १५७ डावात हा पल्ला गाठला होता. त्यापाठोपाठ या यादीत एबी डिविलियर्सचा नंबर लागतो. त्याने १५७ डावात ही कामगिरी करून दाखवली होती.
आयपीएलमध्ये सर्वात जलद ५००० धावा करणारे आघाडीचे ४ फलंदाज
- केएल राहुल - १३० डाव (दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स, लखनऊ, एप्रिल २०२५)
- डेविड वॉर्नर - १३५ डाव (सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, अबू धाबी, ऑक्टोबर २०२०)
- विराट कोहली - १५७ डाव (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स, बंगळुरू, मार्च २०१९)
- एबी डिविलियर्स - १६१ डाव (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, अहमदाबाद, एप्रिल २०२१)