LSG vs DC : मार्करमची कडक खेळी; चीअर लीडर्सच्या 'डग आउट'मध्ये मारला सिक्सर (VIDEO)

लखनौ सुपर जाएंट्सच्या डावातील दुसऱ्याच षटकात त्याने मिचेल स्टार्कला एक जबरदस्त षटकार मारल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 21:13 IST2025-04-22T21:10:19+5:302025-04-22T21:13:36+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 LSG vs DC Aiden Markram Fourth Fifty Hit Three Sixes In His innings One Of Which Landed Right Where The LSG Cheerleaders Were Sitting Watch Video | LSG vs DC : मार्करमची कडक खेळी; चीअर लीडर्सच्या 'डग आउट'मध्ये मारला सिक्सर (VIDEO)

LSG vs DC : मार्करमची कडक खेळी; चीअर लीडर्सच्या 'डग आउट'मध्ये मारला सिक्सर (VIDEO)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 LSG vs DC Aiden Markram Fourth Fifty : लखनौच्या इकाना स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात एडन मार्करम याने लखनौच्या संघाला दमदार सुरुवात करून दिली. या सामन्यात त्याने यंदाच्या हंगामातील चौथे अर्धशतक झळकावल्याचे पाहायला मिळाले. एका बाजूला मिचेल मार्श संयमी खेळी करत असताना मार्करमने उत्तुंग फटकेबाजी करत दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. लयीत दिसणाऱ्या मार्करमच्या दमदार इनिंगला चमीरानं ब्रेक लावला. स्टब्सकडे कॅच देऊन तो तंबूत परतला. मार्करमनं ३३ चेंडूत २ चौकार आणि ५२ षटकाराच्या मदतीने ५२ धावांची खेळी केली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

एक षटकार तर चीअर लीडर्सच्या डक आउटमध्ये जाऊन पडला


लखनौ सुपर जाएंट्सच्या डावातील दुसऱ्याच षटकात त्याने मिचेल स्टार्कला एक जबरदस्त षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. स्टार्कनं जवळपास १३८ kph वेगाने टाकलेल्या चेंडूवर मार्करमनं पुल शॉट्स मारत स्क्वेअर लेगच्या दिशेनं षटकार मारला. मार्करमनं मारलेला चेंडूनं  ६३ मीटर लांब अंतरावर बसलेल्या  LSG च्या चीअर लीडर्सच्या घोळक्यात पडल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय त्याने मुकेश कुमार आणि विपराज निकम याच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार मारल्याचे पाहायला मिळाले.

IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण

 अडखळत सुरुवात केल्यावर धमाकेदार कामगिरीचा सिलसिला

यंदाच्या हंगामात ए़डन मार्करम कमालीच्या फॉर्ममध्ये दिसतोय. पहिल्या दोन सामन्यात तो अडखळत खेळताना दिसले. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याच्या भात्यातून फक्त १५ धावा आल्या होत्या. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध त्याने फक्त एक धाव केली. पण त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स विरुद्धची ६ धावांची खेळी सोडली तर प्रत्येक सामन्यात त्याने धमाकेदार खेळी केल्याचे पाहायला मिळाले. मागील सहा सामन्यात त्याच्या भात्यातून ४ अर्धशतके आली आहेत. 

मार्करमची यंदाच्या हंगामातील त्याची कामगिरी

  • विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ५३(३८)
  • विरुद्ध राजस्थान रॉयल्स ६६ (४५)
  • विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज ६(६)
  • विरुद्ध गुजरात टायटन्स ५८ (३१)
  • विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ४७ (२८)
  • विरुद्ध पंजाब किंग्ज २८ (१८)
  • विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद १ (४)
  • विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स १५ (१३)

Web Title: IPL 2025 LSG vs DC Aiden Markram Fourth Fifty Hit Three Sixes In His innings One Of Which Landed Right Where The LSG Cheerleaders Were Sitting Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.