IPL 2025 LSG vs DC 40th Match Player to Watch Ravi Bishnoi Lucknow Super Giants : लखनौ सुपर जाएंट्स हा संघ आयपीएलमधील तगड्या संघांपैकी एक आहे. कर्णधार रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघाकडून निकोलस पूरन, मिचेल मार्श आणि एडन मार्करम या फलंदाजांनी यंदाच्या हंगामात विशेष छाप सोडली आहे. एका बाजूला आघाडीच्या फलंदाजीतील तगड्या गड्यांची चर्चा रंगत असताना दुसऱ्या बाजूला LSG च्या ताफ्यातून खेळणाऱ्या भारतीय फिरकीपटूनं यंदाच्या हंगामात 'फिफ्टी'सह खास डाव साधल्याचे पाहायला मिळाले. तो फिरकीपटू आहे रवी बिश्नोई. जाणून घेऊयात त्याच्या नावे झालेला खास रेकॉर्ड आणि आयपीएलमधील त्याच्या कामगिरीबद्दल
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या पहिल्या लढतीत साधला खास विक्रम
लखनौ सुपर जाएंट्सच्या संघ हा २०२२ पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. या संघाच्या पदार्पणापासून रवी बिश्नोई संघाचा भाग आहे. यंदाच्या हंगामातील दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात रवी बिश्नोई याने खास विक्रमाला गवसणी घातली. तो या संघाकडून सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने आयुष बडोनीला मागे टाकले. या हंगामाला सुरुवात होण्याआधी LSG कडून सर्वाधिक ४३ सामने खेळण्याचा विक्रम हा युवा बॅटर आयुष बडोनीच्या नावे होता. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात रवी बिश्नोई ४४ LSG कडून ४४ वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले.
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
प्रत्येक सामना खेळत DC विरुद्धच्या दुसऱ्या लढती आधी 'फिफ्टी'
इकाना स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रंगणाऱ्या सामन्याआधी रवी बिश्नोईनं LSG कडून ५१ सामने खेळले आहेत. या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात रवी बिश्नोईनं LSG कडून ५० वा सामना खेळला. यासह संजीव गोएंका यांच्या मालकीच्या लखनौ संघाकडून अर्धशतक झळकवणारा तो पहिला खेळाडूही ठरला. या खास सामन्यात बिश्नोईनं दोन महत्त्वपूर्ण विकेट्सही घेतल्याचे पाहायला मिळाले होते.
रवी बिश्नोईची IPL मधील कामगिरी
लखनौ सुपर जाएंट्सकडून खेळण्याआधी रवी बिश्नोई पंजाब किंग्जच्या ताफ्यातून खेळताना दिसले होते. आयपीएलमध्ये आतापर्यंत त्याने ७४ सामने खेळले असून त्याच्या खात्यात ७१ विकेट्सची नोंद आहे. यंदाच्या हंगामात त्याने ८ सामन्यात ८ विकेट्स घेतल्या असून उर्वरित सामन्यातही त्याच्याकडून संघाला मोठी आस असेल.