IPL 2025 : तो परफेक्ट स्टार्टसह LSG चा पाया भक्कम करतो, मग पूरन येतो अन् बुक्का पाडतो

लखनौचा संघ म्हटलं की, सर्वात आधी आठवतो निकोलस पूरन. कारण प्रत्येक सामन्यात तो प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर अक्षरश: तुटून पडल्याचे पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 17:36 IST2025-04-14T17:32:59+5:302025-04-14T17:36:18+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 LSG vs CSK 30th Match Lokmat Player to Watch Aiden Markram Lucknow Super Giants | IPL 2025 : तो परफेक्ट स्टार्टसह LSG चा पाया भक्कम करतो, मग पूरन येतो अन् बुक्का पाडतो

IPL 2025 : तो परफेक्ट स्टार्टसह LSG चा पाया भक्कम करतो, मग पूरन येतो अन् बुक्का पाडतो

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 LSG vs CSK 30th Match Player to Watch Aiden Markram Lucknow Super Giants :  आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ३० व्या सामना लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जाएंट्स संघ घरच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धचा सामना जिंकत  २ गुणासह गुणतालिकेत दुहेरी आकडा गाठण्याच्या इराद्याने मैदानात उतरले. पहिल्या ६ सामन्यातील ४ विजयासह संघाने यंदाच्या हंगामात प्लेऑफ्स गाठण्याची भक्कम दावेदारी ठोकलीये. यात आघाडीच्या फलंदाजांचा वाटा मोठा आहेय त्यातीलच एक भरवशाचा फलंदाज म्हणजे एडन मार्करम. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

LSG म्हटलं की पूरन आठवतो, पण हा भाऊही कमी नाही

लखनौचा संघ म्हटलं की, सर्वात आधी आठवतो निकोलस पूरन. कारण प्रत्येक सामन्यात तो प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर अक्षरश: तुटून पडल्याचे पाहायला मिळत आहे. पूरनच्या स्फोटक अंदाजाशिवाय संघाच्या सलामीवीरांची कामगिरीही लक्षवेधी राहिली आहे. मिचेल मार्शसोबत डावाची सुरुवात करताना दक्षिण आफ्रिकेचा स्टार एडन मार्कम सुरुवातीच्या सामन्यात अडखळत खेळताना दिसून आले. पण पहिल्या तीन सामन्यानंतर तो जबरदस्त फॉर्ममध्ये दिसतोय. ही लखनौच्या ताफ्यातील एक जमेची बाजू ठरताना दिसतीये. परफेक्ट स्टार्टसह तो पाया भक्कम करणारी खेळी करतोय.

Retired Out केल्यावर मुंबईकर पेटून उठलाय; चेन्नईकर मात्र निवांतच! हेच असावं त्यामागचं कारण

IPL च्या यंदाच्या हंगामात अडखळत सुरुवात केल्यावर तो लयीत आलाय

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात LSG च्या संघाकडून मार्करमनेच डावाला सुरुवात केली. या सामन्यात तो १३ चेंडूत १५ धावा करून तंबूत परतला. मग सनरायझर्स विरुद्ध त्याला दुसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात त आले. यावेळी तो चार चेंडू खेळून एका धावेवर बाद झाला.  पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात पुन्हा त्याच्यावर सलामीची जबाबदारी सोपवण्यात आली. इथं तो लयीत दिसला १८ चेंडूत २८ धावांसह त्याने संघाला चांगली सुरुवात करून दिली. पुढच्या सामन्यात त्याची खेळी आणखी बहरली अन् त्याने यंदाच्या हंगामातील पहिले अर्धशतक झळकावले. मुंबई इंडियन्स विरुद्ध त्याने ३८ चेंडूत ५३ धावांची कडक खेळी केल्याचे पाहायला मिळाले. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धही त्याने तोऱ्यात बॅटिंग केली. पण यावेळी त्याचे अर्धशतक अवघ्या ३ धावांनी हुकले. या सामन्यात त्याने २८ चेंडूत ४७ धावा केल्या होत्या. गुजरात विरुद्ध त्याने ३१ चेंडूत ५८ धावांची खेळी करत सलामीला परफेक्ट स्टार्ट करून देण्यास सक्षम असल्याचे दाखवून दिले. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पुन्हा एकदा त्याच्यावर नजरा असतील. 

Web Title: IPL 2025 LSG vs CSK 30th Match Lokmat Player to Watch Aiden Markram Lucknow Super Giants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.