Join us

IPL 2025 DC vs RCB : विराटसह क्रुणाल पांड्याचा हिट शो! फसलेल्या RCB नं शेवटी दाबात जिंकली मॅच

अवघ्या २६ धावांवर गमावल्या होत्या आघाडीच्या ३ विकेट्स, पण त्यातून सावरत मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 00:30 IST

Open in App

IPL 2025 DC vs RCB  : विराट कोहली आणि क्रुणाल पांड्या यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने घरच्या मैदानातील पराभवाचा हिशोब चुकता केला. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने दिलेल्या धावांचा १६३ धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सुरुवात खूपच खराब झाली. अवघ्या २६ धावांवर संघाने ३ विकेट्स गमावल्या होत्या. पण या बिकट परिस्थितीत कोहली मैदानात तग धरून थांबला. त्याला क्रुणाल पांड्याने साथ दिली अन् शेवटी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने ६ विकेट्स आणि ९ चेंडू राखून विजय मिळवत २ गुण खात्यात जमा करत गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

भुवीसह हेजलवूडचा भेदक मारा,  एकाही दिल्लीकराला करता आली नाही अर्धशतकी खेळी

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात धावफलकावर १६२ धावा लावल्या होत्या. सलामीवीर अभिषेक पोरेल याने ११ चेंडूत २८ धावा करून तंबूचा रस्ता धरला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या करुण नायरला या सामन्यात फारशी चमक दाखवता आली नाही. तो अवघ्या ४ धावांवर बाद झाला. उप कर्णधार फाऱ ड्युप्लेसी याने २२ धावांची खेळी केली. दिल्लीकडून लोकेश राहुलनं ३९ चेंडूत ३ चौकाराच्या मदतीने केलेली ४१ धावांची खेळी सर्वोच्च ठरली. त्याच्याशिवाय ट्रिस्टन स्टब्सनं १८ चेंडूत ३४ धावा केल्याचे पाहायला मिळाले. अक्षर पटेलनं १५ धावांचे योगदान दिले तर विपराज निगमनं ६ चेंडूत १२ धावांची उपयुक्त खेळी केली. आरसीबीकडून भुवनेश्वर कुमारनं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या तर जॉस हेजलवूडनं २ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या.  याशिवाय यश दयाल आणि क्रुणाल पांड्याने प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करताना RCB चा संघ फसलेला

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने दिलेल्या १६३ धावांचा पाठलाग करताना आरसीबीचा संघ चांगलाच फसला होता. पदार्फणाचा सामना खेळणारा जेकब बेथेल १२ धावा करून माघारी फिरला. दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल यानेच संघाला पहिले य़श मिळवून दिले. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या देवदत्त पडिकल याला अक्षर पटेलनं खातेही उघडू दिले नाही. कर्णधार रजत पाटीदार  ६ धावांवर धावबाद झाला. करुण नायरने अप्रतिम फिल्डिंगचा नजराणा दाखवून देत संघाला तिसेर यश मिळून दिले. धावफलकावर अवघ्या २६ धावा असताना RCB च्या संघाने ३ विकेट्स गमावल्या होत्या. संघ अडचणीत असताना क्रुणाल पांड्या मैदानात आला. ही जोडी जमली अन् RCB टेन्शन फ्री झाली.

विराट कोहली-क्रुणाल पांड्याची शतकी भागीदारी

संघ अडचणीत असताना विराट कोहली आणि क्रुणाल पांड्या या दोघांनी सावध पवित्रा घेत भागीदारी फुलवली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत दिल्ली कॅपिटल्सच्या विजयायाचे मनसुबे अक्षरश: उथळून लावले. संघाच्या धावफलकावर १४५ धावा असताना विराट कोहली ४७ चेंडूत ५१ धावा करून माघारी फिरला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या टिम डेविडनं ५ चेंडूत उरलेल्या १९ धावा काढत मॅछ संपवली. दुसऱ्या बाजूला क्रुणाल पांड्या ४७ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ७३ धावांवर नाबाद पतरला.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरदिल्ली कॅपिटल्सविराट कोहलीक्रुणाल पांड्याइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट