IPL 2025 : Kamindu Mendis नं दोन्ही हातांनी गोलंदाजी करण्याचं कसब दाखवलं; अन् विकेटही घेतली (VIDEO)

श्रीलंकन गोलंदाजाच्यात कमालीच टॅलेंट; दोन्ही हातांनी गोलंदाजी करत वेधल लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 21:15 IST2025-04-03T21:09:12+5:302025-04-03T21:15:47+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 KKR vs SRH 15th Match Who Is Kamindu Mendis Sri Lanka All-Rounder Bowled Right Handed Against Venkatesh Iyer And Switched To His Left Hand To Angkrish Raghuvanshi And Take Wicket Watch Video | IPL 2025 : Kamindu Mendis नं दोन्ही हातांनी गोलंदाजी करण्याचं कसब दाखवलं; अन् विकेटही घेतली (VIDEO)

IPL 2025 : Kamindu Mendis नं दोन्ही हातांनी गोलंदाजी करण्याचं कसब दाखवलं; अन् विकेटही घेतली (VIDEO)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात आयपीएलच्या १८ व्या हंगामातील १५ व्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून श्रीलंकन  कामिंदु मेंडिसला आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली. श्रीलंकेकडून तिन्ही प्रकारात खेळणारा हा गोलंदाज आपल्या दोन्ही हातांनी गोलंदाजी करण्यात माहिर आहे. त्याने पहिल्याच आयपीएल सामन्यातील आपल्या पहिल्याच षटकात या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीतील कलाकारी दाखवून दिली.   

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

व्यंकटेश अय्यरला उजव्या हाताने चेंडू टाकला, मग डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करत विकेटचा डाव साधला 

कोलकाता नाईट रायडरर्सच्या डावातील १३ व्या षटकात पॅट कमिन्स याने कामिंदु मेंडिसच्या हाती चेंडू सोपवला. त्याच्या या षटकातील पहिल्याच चेंडूवर अंगकृष्ण रघुवंशीनं सिंगल धाव घेत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर स्टाइकवर आलेल्या व्यंकटेश अय्यरला कमिंदु मेंडिसनं उजव्या हाताने गोलंदाजी केली. त्याने एक धाव घेतली. मग रघुवंशी पुन्हा स्ट्राइकवर आल्यावर कमिंदूनं डाव्या हाताने गोलंदाजी केली. या चेंडूवर त्याला विकेटही मिळाली.

कोण आहे IPL मध्ये SRH ला चीअर करणारी चर्चित ग्लॅमरस चीअर लीडर? जाणून घ्या सविस्तर

कोण आहे कमिंदू मेंडिस?

कमिंदू मेंडिस हा श्रीलंकेचा खेळाडू आहे.  डावखुऱ्या हाताने फलंदाजीसह तो राइट आर्म ऑफ ब्रेक आणि  लेफ्ट आर्म स्लो ऑर्थोडॉक्स बॉलिंग करण्याची क्षमता असणारा गोलंदाज आहे. त्याने २०१८ मध्ये श्रीलंकेच्या संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.  २०२५ च्या हंगामातून तो आयपीएलमध्ये पदार्पण करत आहे. कमिंदू मेंडिस याने श्रीलंकेकडून १२ कसोटीत त्याने ३ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय १९ वनडेसह  २३ आंतरारष्ट्रीय  टी २० सामन्यात त्याच्या खात्यात दोन विकेट्स आहेत. गोलंदाजीशिवाय फलंदाजीमध्ये त्याने कसोटी ११८४ धावा केल्या असून वनडेत ३५३ धावा तर आंतरारष्ट्रीय टी-२० मध्ये त्याच्या नावे ३८१ धावा जमा आहेत.  

सनरायझर्स हैदराबादच्या संघानं या खेळाडूसाठी किती रुपये मोजले?

आयपीएलच्या मेगा लिलावात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने या खेळाडूसाठी ७५ लाख रुपये मोजले होते. पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्या षटकातच त्याने आपल्या गोलंदाजीतील कसब दाखवून देताना चौथ्या चेंडूवर आयपीएलमधील पहिली विकेट घेतली.  

Web Title: IPL 2025 KKR vs SRH 15th Match Who Is Kamindu Mendis Sri Lanka All-Rounder Bowled Right Handed Against Venkatesh Iyer And Switched To His Left Hand To Angkrish Raghuvanshi And Take Wicket Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.