IPL 2025 : किंमत कमी झाली; पण हिमतीनं प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडण्याची धमक कायम

किंमत भेलही कमी झाली असेल पण हा खेळाडू  बिनधास्त अंदाजात गोलंदाजीवर तुटून पडण्याची जी हिंमत दाखवतो ते लाजवाब आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 10:15 IST2025-04-03T10:11:26+5:302025-04-03T10:15:35+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 KKR vs SRH 15th Match Lokmat Player to Watch Quinton de Kock Kolkata Knight Riders | IPL 2025 : किंमत कमी झाली; पण हिमतीनं प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडण्याची धमक कायम

IPL 2025 : किंमत कमी झाली; पण हिमतीनं प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडण्याची धमक कायम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 KKR vs SRH 15th Match Player to Watch Quinton de Kock Kolkata Knight Riders : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात क्विंटन डी कॉक हा कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातून मैदानात उतरल्याचे दिसते. २०१३ च्या हंगामापासून तो या स्पर्धेत वेगवेगळ्या फ्रँयाचझीकडून खेळताना पाहायला मिळाले. मागील ३ हंगामात तो लखनौच्या संघाचा भाग होता. या नव्या फ्रँचायझीनं त्याला अधिक किंमत दिल्याचेही पाहायला मिळाले. ६.७५ कोटींसह तो या ताफ्यातून खेळला. पण यावेळी त्याचा भाव घसरला. ३.६० कोटींसह तो कोलकाताच्या ताफ्यात खेळतोय.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

किंमत कमी झाली, पण हिमतीनं भिडण्याची धमक दिसली

 किंमत भेलही कमी झाली असेल पण हा खेळाडू  बिनधास्त अंदाजात गोलंदाजीवर तुटून पडण्याची जी हिंमत दाखवतो ते लाजवाब आहे. त्यामुळेच यंदाच्या हंगामात कोलकाता संघासाठी तो  एक प्रमुख आणि उपयुक्त खेळाडू ठरतो. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिल्या ३ डावातील दोन डावात तो अपयशी ठरला. पण राजस्थान रॉयल्सविरुद्धची त्याची ९७ धावांची खेळी कमालीची होती. तो यंदाच्या हंगामात काय करू शकतो, याची झलक त्याच्या या खेळीत दिसली. कोलकाताकडून खेळताना तो आयपीएलच्या इतिहासातील आपली सर्वाच्च कामगिरी करणार का? तेही पाहण्याजोगे असेल.

IPL 2025: MS धोनीच्या विकेटनंतर राग व्यक्त करणारी 'ती' मिस्ट्री गर्ल सापडली! जाणून घ्या कोण?

हैदराबाद-दिल्ली-बंगळुरु-मुंबई-लखनौ ते कोलकाता असा आहे क्विंटन डी कॉकचा प्रवास

क्विंटन डी कॉकनं २०१३ मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. या हंगामात ३ सामन्यात त्याने फक्त ६ धावा काढल्या. स्फोटक फलंदाज आयपीएलच्या पदार्पणाच्या हंगामात बोगस ठरला. २०१४ च्या हंगामात दिल्ली डेअरडेविल्सच्या ताफ्यात गेल्यावरही त्याचा संघर्ष सुरु होता. अखेर २०१६ च्या हंगामात त्याची बॅट तळवली. आयपीएलमधील पहिल्या शतकासह या हंगामात त्याने १३ सामन्यात ४४५ धावा कुटल्या. आयपीएलमध्ये तो रंगात आलाय असे दिसत असताना २०१८ च्या हंगामात आरसीबीत गेला अन्  या फ्रँचायझीकडून तो फेल ठरला. मग त्याने मुंबई इंडियन्स आणि लखनौच्या ताफ्यातून मैफिल लुटली. 

मुंबई इंडियन्सकडून खेळताना IPL चॅम्पियनचा टॅग

क्विंटन डीकॉक हा २०१९ आणि २०२० च्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. या दोन्ही हंगामात त्याने ५०० पेक्षा अधिक धावा करत आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी केली. या दोन्ही हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाने जेतेपद पटकावले होते. क्विंटन डीकॉकने यात मोलाचा वाटाही उचलल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर २०२२ च्या हंगामात तो लखनौचा झाला. या संघाकडून पदार्पणाच्या हंगामात त्याने नाबाद १४० धावांची खेळी केल्याचे पाहायला मिळाले होते. ही आयपीएलमधील त्याची आतापर्यंतची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.   
 

Web Title: IPL 2025 KKR vs SRH 15th Match Lokmat Player to Watch Quinton de Kock Kolkata Knight Riders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.