Join us

KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...

RR चं कॅसेट गुंडाळले अन् ईडन गार्डन्सच्या मैदानात शेवटी KKR प्लेऑफ्ससाठी है तैयार गाणं वाजलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 20:10 IST

Open in App

IPL 2025 KKR Beat RR By 1 Run In Thriller ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळवण्यात आलेला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार झाला. अखेरच्या षटकात राजस्थान रॉयल्सच्या संघाला २२ धावांची गरज असताना इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात आलेल्या शुभम दुबेनं धमाकेदार बॅटिंग करत कोलकाता नाईट रायडर्सचे टेन्शनच वाढवले होते. पण अखेर वैभव अरोरानं शेवटच्या चेंडूवर ३ धावांची गरज असताना अप्रतिम यॉर्करसह कमबॅक करत हातून निसटलेला सामना कोलकाताच्या बाजूनं फिरवला. अखेरच्या चेंडूवर दुहेरी धाव घेताना जोफ्रा आर्चर रन आउट झाला अन् कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने एका धावेसह सामना जिंकत २ गुण आपल्या खात्यात जमा करत  प्लेऑफ्सच्या शर्यतीतील आपल्या आशा पल्लवित ठेवल्या आहेत. राजस्थान रॉयल्सच्या संघानं या सामन्यात  "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण अखेरच्या चेंडूवर वैभव अरोरानं उत्तम यॉर्कर टाकल्यामुळे RR चं कॅसेट गुंडाळलं अन् ईडन गार्डन्सच्या मैदानात KKR  प्लेऑफ्ससाठी है तैयार गाणं वाजलं.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

केकेआरकडून रसेलसह रघुवंशी अन् रिंकूची तुफान फटकेबाजी

राजस्थान रॉयल्सचा संघ स्पर्धेतून आधीच आउट झाला आहे. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स संघ प्लेऑफ्सच्या आशा कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना सुनील नरेन ११ धावांवर तंबूत परतला. सलामीवीर गुरबाझनं २५ चेंडूत केलेली ३५ धावांची खेळी आणि अजिंक्य रहाणेनं २४ चेंडूत ३० धावा करत संघाचा डाव सावरला. त्यानंतर अंगकृष्ण रघुवंशीनं ३१ चेंडूत ४४ धावांची दमदार खेळी केली. अखेरच्या षटकात आंद्रे रसेलनं २५ चेंडूत केलेली ५७ धावांची नाबाद खेळी आणि रिंकू सिंह याने ६ चेंडूत कुटलेल्या १९ धावांच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने निर्धारित २० षटकात ४ बाद २०६ धावा करत राजस्थानसमोर २०७ धावांचे टार्गेट सेट केले होते. 

IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड

राजस्थानची सुरुवात खराब झाली. पण रियान परागच्या खेळीनं वाढवलं होतं KKR चं टेन्शन

केकेआरनं सेट केलेल्या टार्गेटचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. १४ वर्षीय युवा बॅटर वैभव सूर्यंवशी २ चेंडूत एक चौकार मारून बाद झाला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या कुणाल सिंग राठोड याला मोईन अलीनं खातेही उघडू दिले नाही. यशस्वी जैस्वाल २१ चेंडूत ३४ धावा करून परतल्यावर हा सामना कोलकाताच्या बाजूनं झुकला होता. पण रियान परागची बॅठ तळपली. त्याला हेटमायरची साथ लाभली अन् राजस्थानच्या संघाने कोलकाता नाईट रायडर्सचे टेन्शन वाढवले. रियान पराग ४५ चेंडूत ९५ धावांवर बाद झाला.  धोकादायक ठरत असलेल्या हेटमायरला हर्षित राणाने २९ धावांवर तंबूत धाडले. शेवटच्या षटकात तुफान फटकेबाजी करत राजस्थानच्या विजयाच्या आशा पल्लवित करणाऱ्या  शुभम दुबेनं १४ चेंडूत नाबाद २५ धावांची खेळी केली. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.  

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५कोलकाता नाईट रायडर्सराजस्थान रॉयल्सइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट