Andre Russell Record With Fifty : राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात आंद्रे रसेल याला संघातील सर्वात महागड्या आणि उप कर्णधार असलेल्या व्यंकटेस अय्यर आधी बढती मिळाली. मग या संधीचा पुरेपूर फायदा उठवत मसल पॉवर रसेलनं आपली ताकद दाखवून दिली. यंदाच्या हंगामात आतापर्यंत जेवढे षटकार मारले नव्हते तेवढे षटकार एका डावात मारत त्याने अर्धशतक साजरे केले. या सामन्यात त्याने २५ चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने २२८ च्या स्ट्राइक रेटनं नाबाद ५७ धावांची खेळी केली. त्याच्या या दमदार खेळीच्या जोरावर KKR च्या संघाने धावफलकावर २०६ धावा लावल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गंभीर पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर पोहचला रसेल
आंद्रे रसेल याने या अर्धशतकासह खास क्लबमध्ये एन्ट्री मारली आहे. गेल्या काही वर्षांपासून तो कोलकाता नाईट रायडर्सच्या संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसतोय. राजस्थान विरुद्धच्या सामन्यातील धमाकेदार खेळीसह त्याने कोलकाताच्या संघाकडून खेळताना २५०० धावसंख्येचा टप्पा पार केला आहे. केकेआरकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो गौतम गंभीर पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ ८४ डावांमध्ये २४३९ धावांसह रॉबिन उथप्पा तिसऱ्या स्थानावर आहे.
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
केकेआरकडून यंदाच्या हंगामातील सर्वात जलद अर्धशतक
आंद्रे रसेलला केकेआर विरुद्ध पाचव्या क्रमांकावर बढती देण्यात आली होती. त्याने २२ चेंडूत अर्धशतक ठोकले. आयपीएल २०२५ च्या हंगामातील केकेआरच्या ताफ्यातील फलंदाजाचे हे सर्वात जलद अर्धशतक ठरले. याआधी अजिंक्य रहाणेनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात २४ चेंडूत अर्धशत साजरे केले होते.
ईडन गार्डन्सच्या मैदानात १००० धावा करणारा तिसरा फलंदाज
कॅरेबियन सुपरस्टार टी-२० मध्ये ईडन गार्डन्सवर १००० पेक्षा अधिक धावा करणारा तिसरा फलंदाजही ठरला आहे. या यादीतही गौतम गंभीर आघाडीवर आहेत. गंभीरनं आपल्या कारकिर्दीत या मैदानात १४६२ धावा केल्या आहेत. रॉबिन उथप्पाच्या खात्यात ११६० धावांची नोंद असून त्यापाठोपाठ आता आंद्र रसेलच्या खात्यात १०४७ धावा जमा झाल्या आहेत.
Web Title: IPL 2025 KKR vs RR Andre Russell Destroys RR With Vintage Fifty Reaches Elite KKR Landmark In IPL
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.