Join us

अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)

रंगतदार सामन्यात अजिंक्यच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 21:40 IST

Open in App

KKR vs RR, IPL 2025 : कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात झालेल्या  रंगतदार लढतीत कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने  बाजी मारली. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने युवा वैभव सूर्यंवशीचा एक जबरदस्त कॅच घेतल्याचे पाहायला मिळाले. टॉस जिंकल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना कोलकताच्या संघाने २०६ धावा करत राजस्थानसमोर २०७ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाची सुरुवात खराब झाली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

अजिंक्य रहाणेनं अप्रतिम कॅच घेत वैभव सूर्यंवशीच्या इनिंगला लावला ब्रेक

आयपीएलमध्ये ऐतिहासिक शतक झळकावणारा १४ वर्षांचा बॅटर वैभव सूर्यवंशी सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. वैभव अरोरानं ऑफ स्टंप बाहेर टाकलेल्या आखूड टप्प्यावरील चेंडू लेग साइडला ओढून मारण्याच्या नादात त्याने विकेट गमावली. अजिंक्य रहाणेनं मागे पळत जात त्याचा अप्रतिम झेल टिपला.

KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...

अजिंक्य रहाणेचा कॅच भारीच; त्यानंतर रिॲक्शनसह आणखी एका गोष्टीची चर्चा

वैभव सूर्यंवशीचा कॅच घेतल्यावर अजिंक्य रहाणेनं आक्रमक अंदाजात त्याच्या विकेटचे  सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. पोरग १४ वर्षांचे असले तरी ही विकेट मोठी आहे, हेच ३६ वर्षीय कूल अजिंक्यच्या सेलिब्रेशनमधून दिसून आले. त्याच्या सेलिब्रेशनसह  अजिंक्य रहाणेनं हाताला पट्ट्या बांधलेल्या असताना अप्रितम कॅच घेतल्याची गोष्टही चर्चेत आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात रहाणेच्या हाताला दुखापत झाली होती. अजूनही त्याची दुखापत पूर्णत: बरी झालेली नाही. तो हाताला पट्ट्या बांधूनच मैदानात उतरला होता. त्यात त्याने कमालीचा कॅच घेतल्यामुळे काही चाहत्यांना हा कॅच अधिक भावला आहे.

सलग दुसऱ्या सामन्यात वैभव सूर्यंवशीच्या पदरी निराशा

१४ वर्षीय वैभव सूर्यंवशी याने शतकी खेळीसह IPL मध्ये धमाका केला. पण त्यानंतर दोन सामन्यात त्याच्या पदरी निराशा आलीये. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात दीपक चाहरने त्याला खातेही उघडू दिले नव्हते. या अनुभवी गोलंदाजानेही वैभवची विकेट घेतल्यावर आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धही वैभव फक्त ४ धावा करून तंबूत परतला. यातून सावरण्याचे मोठे चॅलेंज या युवा बॅटरसमोर असेल.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५कोलकाता नाईट रायडर्सराजस्थान रॉयल्सअजिंक्य रहाणेइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेटव्हायरल व्हिडिओ