Join us

IPL 2025 : अनसोल्ड राहिल्यावर नेटबॉलर झाला, मग मिळाली कमबॅकची संधी

नेट बॉलरच्या रुपात संघासोबत असलेल्या या गड्याला कोलकाताच्या संघाने ७५ लाख रुपयांसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 11:20 IST

Open in App

IPL 2025 KKR vs RR 53rd Match  Player to Watch Chetan Sakariya Kolkata Knight Riders : कोलकाता नाईट रायडर्स (KKR) च्या ताफ्यातून डावखुऱ्या हाताने जलदगती गोलंदाजी करणाऱ्या चेतन सकारियाला  पुन्हा एकदा आयपीएलमध्ये कमबॅकची संधी मिळाली आहे.  पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात सकारियाने KKR कडून पदार्पणाचा सामना खेळला. तो उमरान मलिकच्या जागी इंज्युरी रिप्लेसमेंटच्या रुपात संघात सामील झालाय. नेट बॉलरच्या रुपात संघासोबत असलेल्या या गड्याला कोलकाताच्या संघाने ७५ लाख रुपयांसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. एक नजर त्याच्या आयपीएलमधील कामगिरीवर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!अन् अनसोल्ड चेतन सकारियाला KKR नं दिली कमबॅकची संधी

चेतन सकारिया याने २०२१ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून पदार्पण केल्याचे पाहायला मिळाले होते. पदार्पणाच्या हंगामात स्विंग आणि यॉर्करच्या माऱ्यासह त्याने आपल्या गोलंदाजीतील धमकही दाखवून दिली. याशिवाय तो दिल्ली कॅपिटल्सकडूनही खेळताना दिसले. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर त्याला टीम इंडियातही संधी मिळाली. पण सातत्याच्या दुखापतीमुळे त्याच्या करिअरचा वेग मंदावला. आयपीएलमध्ये आतापर्यंत त्याने २० सामन्यात २० विकेट्स घेतल्या आहेत. 

IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)

कमबॅकच्या सामन्यात विकेट लेस राहिला, आता...

दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहिलेल्या चेतन सकारियाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवून दिली आहे. सौराष्ट्र संघाकडून क्रिकेटच्या सर्व प्रकारात त्याने आपली उपयुक्तता दाखवून दिलीये. अनसोल्ड राहिल्यावर तो KKR च्या संघात नेटबॉलरच्या रुपात सामील झाला होता. पंजाब किंग्ज विरुद्ध अजिंक्य रहाणेनं त्याला संधी दिली. कमबॅकच्या सामन्यात त्याने ३ षटकात ३९ धावा खर्च केल्या. यात त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. उर्वरित सामन्यात KKR चा संघ त्याला किती सामन्यात संधी देणार? गत चॅम्पियन संघाला प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकवून ठेवण्यासाठी तो उपयुक्त ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५कोलकाता नाईट रायडर्सराजस्थान रॉयल्सइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट