IPL 2025 : रोहित-रितिकासोबतच्या खास बॉन्डिंगमुळे चर्चेत आलेला चेहरा! द्रविडसाठी तो भरवशाचा ठरणार का?

IPL मध्ये ५ धावांत ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम करून दाखवलीये गोलंदाजीतील धमक, आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 13:05 IST2025-05-04T12:58:35+5:302025-05-04T13:05:48+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 KKR vs RR 53rd Match Lokmat Player to Watch Akash Madhwal Rajasthan Royals | IPL 2025 : रोहित-रितिकासोबतच्या खास बॉन्डिंगमुळे चर्चेत आलेला चेहरा! द्रविडसाठी तो भरवशाचा ठरणार का?

IPL 2025 : रोहित-रितिकासोबतच्या खास बॉन्डिंगमुळे चर्चेत आलेला चेहरा! द्रविडसाठी तो भरवशाचा ठरणार का?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 KKR vs RR 53rd Match Player to Watch Akash Madhwal Rajasthan Royals : यंदाच्या हंगामात संजू सॅमसनच्या दुखापतीचा राजस्थान रॉयल्सच्या संघाला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या ११ सामन्यात संजू सॅमसन फक्त ७ सामने खेळला. त्याच्या अनुपस्थितीत नेतृत्वासह बॅटिंगमध्ये निर्माण झालेली उणीव भरून काढण्यात रियान पराग कमी पडला अन् राजस्थान रॉयल्स संघ यंदाच्या हंगामातून प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर पडणारा दुसरा संघ ठरला.

राजस्थानचा संघ या दोन संघांना आणू शकतो गोत्यात

स्पर्धेतील आपला प्रवास संपुष्टात आल्यावर उर्वरित तीन  सामन्यात राजस्थानचा संघ कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज विरुद्ध सामने खेळणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघ वगळता अन्य दोन संघ प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकून आहेत. हे संघ राजस्थानमुळे गोत्यात येऊ शकतात. जर राजस्थानच्या संघाने कोलकातासह पंजाबला पराभवाचा दणका दिला तर प्लेऑफ्सच्या शर्यतीतील समीकरण बदलू शकते. 

RR च्या ताफ्यातील नवा मोहरा; जो रोहित-रितिकासोबतच्या बॉन्डिंगमुळे चर्चेत 

IPL च्या यंदाच्या हंगामातील उर्वरित सामन्यात राजस्थानचा संघ कोणत्या मोहऱ्यावर डाव खेळणार त्यावरही सर्वांच्या नजरा असतील. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात राजस्थानच्या संघाने आकाश मधवाल याला पदार्पणाची संधी दिल्याचे पाहायला मिळाले. राजस्थानच्या संघाकडून पदार्पणाचा सामना खेळताना हा गोलंदाज मैदानातील कामगिरीशिवाय रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांच्या खास बॉन्डिंगमुळे चर्चेत आला. राजस्थान संघाकडून मुंबई इंडियन्स विरुद्ध पदार्पणाचा सामना खेळल्यावर रोहितची भेट अन् त्याने मैदानातून रितिकाला हात जोडून केलेला नमस्कार हे दृश्य चर्चेचा विषय ठरले. आता उर्वरित सामन्यात द्रविड त्याच्यावर भरवसा कायम ठेवणार का? तो धमक दाखवत तो संधीच सोन करण्यात यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.


५ धावांत ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम

आकाश मधवाल याने २०२३ च्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. MI च्या ताफ्यातून खेळताना १३ सामन्यात त्याने १९ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. यातील १४ विकेट्स त्याने पदार्पणाच्या हंगामात घेतल्या होत्या. लखनौ सुपर जाएंट्स विरुद्धच्या सामन्यात ५ धावा खर्च करून ५ विकेट्स घेत त्याने आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवली आहे.  राजस्थानच्या संघाने मेगा लिलावात १.२ कोटी एवढी मोठी बोली लावून त्याला आपल्या ताफ्यात घेतले. पण त्याला पहिल्या १० सामन्यात एकही संधी मिळाली नाही. द्रविडच्या कोचिंगमध्ये संघात असलेल्या प्रत्येकाला पुरेशी संधी मिळते. RR कडून पदार्पणात त्याने खास छाप सोडली नसली तरी उर्वरित प्रत्येक सामन्यात तो खेळेल अशी अपेक्षा आहे. 

Web Title: IPL 2025 KKR vs RR 53rd Match Lokmat Player to Watch Akash Madhwal Rajasthan Royals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.