Join us

Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)

सुनील नरेनच्या गोलंदाजीवर आक्रमक अंदाज, प्रीती झिंटानंही दिली दाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 21:57 IST

Open in App

IPL 2025 KKR vs PBKS : कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पंजाब किंग्जची सलामी जोडी घरच्या मैदानावर खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सवर भारी पडली. प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य या अनकॅप्ड जोडीनं शतकी भागीदारीसह संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघेही शतकाच्या दिशेनं वेगाने वाटचाल करताना दिसले. पण एकालाही शतकाला गवसणी घालता आली नाही. 

दोघांची तुफान फटकेबाजी, प्रभसिमरनचा उलटा फटका ठरला लक्षवेधी

या सामन्यात प्रियांश आर्य ३५ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांसह ६९ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर प्रभसिमरन सिंगने ४९ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने ८३ धावांची खेळी केली. दोघांनी आपल्या खेळीत काही अप्रतिम फटके मारले. यात प्रभसिमरन सिंग याने मारलेला रिव्हर्स स्वीप फटका कमालीचा होता. उजव्या हाताच्या बॅटरने सुनील नरेनच्या गोलंदाजीवर डावखुरा होऊन मारलेला सिक्सर सध्या चर्चेचा विषय ठरतोय. त्याचा हा फटका बघून संघाची सह मालकीण प्रीती झिंटाही जाम खूश झाल्याचे पाहायला मिळाले.

सुनील नरेनच्या गोलंदाजीवर आक्रमक अंदाज, प्रीती झिंटानंही दिली दाद

पहिल्या दोन षटकात प्रियांश आर्य आणि प्रभसिमनर सिंग याने सुनील नरेनच्या गोलंदाजीवर अगदी संयमी खेळ दाखवला. दोन षटकात फक्त ७ धावा आल्या. पण तिसऱ्या षटकात या दोघांनी आक्रमक तोरा दाखवला. पंजाबच्या डावातील ११ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर प्रियांश आर्य याने षटकार मारत सुनील नरेनचं स्वागत केले. त्यानंतर एकेरी धाव गेत त्याने प्रभसिमरन सिंगला स्ट्राइक दिले. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर प्रभसिमरन सिंगनं डावखुरा होत खेळलेला रिव्हर्स स्विप शॉट जबरदस्त होता. त्याने 'उलटा' फटका खेळून मिळवलेला सिक्सर पाहून प्रीती झिंटानेही त्याला दाद दिल्याचे पाहायला मिळाले. सुनील नरेनच्या या पंजाबच्या जोडीनं २२ धावा कुटल्या. 

आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा

पंजाबच्या धावफलकावर लागल्या २०१ धावा 

दोन्ही सलामीवीरांनी केलेल्या अर्धशतकी खेळीनंतर कर्णधार श्रेयस अय्यरनं केलेल्या १६ चेंडूतील नाबाद २५ धावा आणि जॉश इंग्लिस याने ६ चेंडूत केलेल्या ११ धावांच्या जोरावर पंजाबच्या संघाने निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात २०१ धावा करत कोलकातासमोर २०२ धावांचे टार्गेट सेट केल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५पंजाब किंग्सकोलकाता नाईट रायडर्सइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट