IPL 2025 : आधी सलामीचा प्रयोग फसला! अजिंक्य रहाणे त्याला आणखी एक संधी देणार?

KKR चा संघ गत हंगामात संघाला चॅम्पियन करणारा माजी कॅप्टन श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाबच्या संघाला भिडणार असल्यामुळे या सामन्यात एक वेगळी रंगत पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 12:55 IST2025-04-26T12:52:21+5:302025-04-26T12:55:45+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 KKR vs PBKS 44th Match Lokmat Player to Watch Rahmanullah Gurbaz Kolkata Knight Riders | IPL 2025 : आधी सलामीचा प्रयोग फसला! अजिंक्य रहाणे त्याला आणखी एक संधी देणार?

IPL 2025 : आधी सलामीचा प्रयोग फसला! अजिंक्य रहाणे त्याला आणखी एक संधी देणार?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 KKR vs PBKS 44th Match Player to Watch Rahmanullah Gurbaz Kolkata Knight Riders : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स संघाला यंदाच्या हंगामात स्पर्धेत टिकून राहण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघाने आतापर्यंत खेळलेल्या ८ सामन्यात ५ सामने गमावले असून ३ सामन्यातील विजयासह त्यांनी ६ गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत. उर्वरित ६ पैकी ५ सामने जिंकले तरच त्यांना स्वबळावर प्लेऑफ्समध्ये एन्ट्री मारता येईल. त्यामुळे पंजाब किंग्ज विरुद्धची घरच्या मैदानातील लढाई त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असेल. त्यात KKR चा संघ गत हंगामात संघाला चॅम्पियन करणारा माजी कॅप्टन श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाबच्या संघाला भिडणार असल्यामुळे या सामन्यात एक वेगळी रंगत पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. 

  'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

KKR संघाचा सलामीचा नवा प्रयोग

मागील सामन्यात कोलकाताच्या संघाने सलामीला नवा प्रयोग करत अफगाणिस्तानच्या रहमानुल्लाह गुरबाझला संधी दिल्याचे पाहायला मिळाले. त्याला आणखी एक संधी मिळणार की, पुन्हा क्विंटन डिकॉक या महत्त्वपूर्ण सामन्यात खेळणार ते पाहण्याजोगे असेल. इथं एक नजर टाकुयात रहमानुल्लाह गुरबाझच्या आयपीएलमधील कामगिरीवर

IPL 2025 : चार वेळा 'रिजेक्ट'चा ठपका! आता विराट कोहलीमुळे तो पुन्हा 'पिक्चर'मध्ये आलाय

आतापर्यंत कशी राहिलीये IPL मधील कामगिरी?

अफगाणिस्तानच्या ताफ्यातील उजव्या हाताचा फलंदाज रहमानुल्लाह गुरबाझ हा मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता असणारा एक धडाकेबाज सलामीवीर आहे. मागील तीन हंगामापासून तो कोलकाताच्या संघातून खेळताना दिसते. २०२३ च्या हंगामात त्याला ११ सामन्यात संधी मिळाली होती. यावेळी त्याने २२७ धावा करताना गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात ८१ धावांची दमदार खेळी पाहायला मिळाली होती. याच हंगामात त्याच्या भात्यातून दोन अर्धशतके पाहायला आली आहेत.. गत हंगामातही त्याला फक्त ३ सामन्यात संधी मिळाली. यात ३९ ही त्याची सर्वाच्च धावसंख्या होती. 

पहिल्या सामन्यात संधीच सोनं करण्यात अपयशी, आता...

यंदाच्या हंगामात आठव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने  क्विंटन डिकॉकच्या जागी रहमानुल्लाह गुरबाझ याला संधी दिली. पण अवघ्या एका धावेवर तो बाद झाला. क्विंटन डिकॉकने ७ सामन्यात ९७ धावांच्या नाबाद खेळीसह १४३ धावा केल्या आहेत. एक मोठी खेळी सोडली तर तोही सातत्याने अपयशी ठरल्याचे दिसून आले. त्यामुळे KKR संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे पुन्हा डिकॉकचा पर्याय निवडणार  की,  रहमानुल्लाह गुरबाझ याला आणखी एक संधी देणार ते पाहण्याजोगे असेल. 

Web Title: IPL 2025 KKR vs PBKS 44th Match Lokmat Player to Watch Rahmanullah Gurbaz Kolkata Knight Riders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.