IPL 2025 KKR vs PBKS 44th Match Player to Watch Harpreet Brar Punjab Kings : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पंजाब किंग्जचा संघ दमदार कामगिरी करताना दिसतोय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या दोन्ही सामन्यात पंजाबच्या संघाने हरप्रीत ब्रारला संधी दिल्याचे पाहायला मिळाले. यंदाच्या हंगामातील दोन सामन्यात त्याने ३ विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले. गोलंदाजीतील कामगिरीशिवाय सामन्यादरम्यान विराट कोहलीनं त्याच्यासमोर दाखवलेला तोरा चर्चेचा विषय ठरतोय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
किंग कोहलीमुळे तो पुन्हा 'पिक्चर'मध्ये आलाय
PBKS विरुद्ध RCB यांच्यातील सामन्यातील विराट कोहली आणि हरप्रीत ब्रार यांच्यातील मैदानातील जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात कोहली या फिरकीपटूला म्हणतो की, "मी इथं २० वर्षांपासून आहे. तुझ्या कोचलाही चांगलेच ओळखतो!" किंग कोहली हरप्रीत ब्रारला धमकी देतोय की काय? असेच हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यावर वाटते. पण तसे अजिबात नाही. याउलट मजेशीर अंदाजात हरप्रीत ब्रारची फिरकी घेताना कोहलीने त्याच्या गोलंदाजीत आता पूर्वीच्या तुलनेत गतीही दिसते, ही गोष्टही बोलून दाखवली. कोहलीचे शब्द फिरकीपटू उर्वरित सामन्यात पंजाब किंग्जचा संघासाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो, याची हमी देणारे आहेत. विराटमुळे तो पुन्हा 'पिक्चर'मध्ये आला असून PBKS च्या संघाकडून त्याला किती सामन्यात संधी मिळणार? अन् तो आपली हिरोगिरी दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल.
CSK चा पराभव अभिनेत्रीच्या जिव्हारी लागला! श्रुती हासनचा स्टेडियम स्टँडमधील व्हिडिओ होतोय व्हायरल
चार वेळा रिजेक्ट; नोकरीसाठी कॅनडाला जाण्याच्या तयारीत असताना आला होता कॉल
पंजाबमधील जिल्हाअंतर्गत क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेतल्यानंतरही हरप्रीत ब्रारला पंजाब संघाकडून संधी मिळत नव्हती. १९ वर्षांखालील संघातून दमदार कामगिरी केल्यावरही प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची डाळ शिजत नव्हती. दुसऱ्या बाजूला त्याने आयपीएलमध्ये पंजाब किंग्जच्या संघाकडून संधी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. इथंही ४ वेळा तो रिजेक्ट झाला. २०१९ मध्ये पंजाब अंडर २३ संघात त्याला संधी मिळाली. पण त्यावेळी त्याला धमक दाखवता आली नाही. हरप्रीत ब्रारनं मग क्रिकेट सोडून नोकरीसाठी कॅनडाला जाण्याचा विचार केला. तो याच्या तयारीत असतानाच त्याला पंजाब किंग्ज संघाकडून कॉल आला अन् २० लाख रूपयांसह तो या संघाचा भाग ढाला.
आयपीएल पदार्पणानंतर दोन हंगामात पाटी होती कोरी, विराटची विकेट घेतली अन्...
चार हंगामात रिजेक्टचा ठपका पडल्यावर २०१९ मध्ये हरप्रीत ब्रारला आयपीएलमधील पंजाब फ्रँचायझी संघाकडून पदार्पणाची संधी मिळाली. पण २०१९ च्या हंगामात त्याला फक्त दोनच सामन्यात संधी मिळाली. यातही एकही विकेट त्याच्या हाती लागली नव्हती. २०२० च्या हंगामात तर त्याला फक्त एका सामन्यात संधी मिळालीय यावेळीही त्याची पाटी कोरीच राहिली. पण पंजाबच्या संघानं त्याच्यावरील भरवसा कायम ठेवला. २०२१ च्या हंगामात त्याने विराट कोहलीच्या रुपात आयपीएलमधील आपली पहिली विकेट घेतली. या हंगामातील २६ व्या सामन्यात त्याने विराट कोहलीशिवाय मॅक्सवेल आणि एबी डिविलियर्सची विकेट घेतली होती. दमदार गोलंदाजी आधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात त्याने १७ चेंडूत २ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने २५ धावा करत फलंदाजीतील क्षमताही दाखवून दिली होती. या कामगिरीनंतर तो सातत्याने पंजाबच्या ताफ्यातून खेळताना दिसतोय.
हरप्रीत ब्रारची IPL मधील कामगिरी
लेफ्ट आर्म स्पिनर आपल्या गोलंदाजीशिवाय डावखुऱ्या हाताने फलंदाजीत उपयुक्त ठरेल असा खेळाडू आहे. आतापर्यंत ४२ IPL सामन्यात त्याने २३३ धावा केल्या असून त्याच्या खात्यात २८ विकेट्स जमा आहेत. बंगळुरु विरुद्धच्या दोन्ही सामन्यात मोक्याच्या क्षणी विकेट्स घेत त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केलीये. उर्वरित सामन्यात श्रेयस अय्यरसाठी तो हुकमी एक्का ठरू शकतो.
Web Title: IPL 2025 KKR vs PBKS 44th Match Lokmat Player to Watch Harpreet Brar Punjab Kings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.