Join us

IPL 2025 : पुणेकरासमोर रुळावरून घसरलेल्या 'चेन्नई एक्स्प्रेस'ला ट्रॅकवर आणण्याचे चॅलेंज

बॅटिंगमधील धमक दाखवण्यासोबतच संघाला ट्रॅकवर आणण्याचं दुहेरी चॅलेंज घेऊन तो मैदानात उतरेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 15:35 IST

Open in App

IPL 2025 PBKS vs CSK 22th Match Player to Watch Ruturaj Gaikwad Chennai Super Kings : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघानं विजयी सलामी दिली. पण मुंबई इंडियन्स विरुद्धच्या विजयानंतर चेन्नई एक्सप्रेस ट्रॅकवरून घसरली. सलामीचा प्रयोग, पॉवरप्लेमधील फलंदाजीसह गोलंदाजांच्या पदरी येणारे अपयश आणि अखेरच्या षटकात मोठ्या फटकेबाजीची गरज असताना संथ धावगतीने होणाऱ्या धावा अशा अनेक कारणांमुळे सहा वेळा IPL चॅम्पियन ठरलेला संघ यंदाच्या हंगामात संघर्ष करताना दिसतोय. त्यामुळे पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात आपल्या बॅटिंगमधील धमक दाखवण्यासोबतच संघाला ट्रॅकवर आणण्याचं दुहेरी चॅलेंज CSK चा कर्णधार ऋतुराज गायकवाडसमोर असेल. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

राहुल त्रिपाठीच्या जागी आला तोही बिन कामाचा ठरला

रचिन रवींद्रसह राहुल त्रिपाठीनं यंदाच्या हंगामात पहिल्या तीन सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या डावाची सुरुवात केली. पण राहुल त्रिपाठी तिन्ही सामन्यात आपल्या फलंदाजीतील छाप सोडण्यात अपयश आले. ही उणीव भरून काढण्यासाठी सलामीला डेवॉन कॉन्वेचा प्रयोग झाला. पण तोही बिनकामाचा निघाला. त्यात रचिन रवींद्र आणि ऋतुराज गायकवाड यांच्यातील कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे चेन्नई संघाच्या अडचणीत भर पडली.

IPL 2025 : चेंडू लपवून 'विकेट कलेक्टर'ची स्टाइल कॉपी करणारा LSG च्या ताफ्यातील 'तिकीट कलेक्टर'

 सलामीचे प्रयोग अन्  योग्य तोडगा 

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाला आधी सलामीची डोकेदुखी कमी करण्यासाठी उत्तम डाव खेळावा लागेल. पंजाब विरुद्धच्या लढतीत डेवॉन कॉन्वे आणि रचिन रवींद्र जोडी पुन्हा ही जबाबदारी पार पाडण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार की, ऋतुराज गायकवाड ही जबाबादारी आपल्या खांद्यावर घेणार ते पाहण्याजोगे असेल. दोन डावखुऱ्या फलंदाजांसह डावाला सुरुवात करण्यापेक्षा लेफ्ट राइट कॉम्बिनेशनसाठी ऋतुराज गायकवाड हा उत्तम पर्याय असून हा प्रयोग संघासाठीही फायद्याचा ठरू शकतो.

१८० प्लस धावांचे चक्रव्यूव्ह भेदण्याची रणनिती; इथं जड्डूसह शिवम दुबेचा रोल ठरेल महत्त्वाचा

चेन्नई सुपर किंग्जचा संघ १८० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना सातत्याने अपयशी ठरताना दिसतोय.  २०१८ नंतर संघाने १८० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केलेला नाही. संघाची शान असणारा महेंद्रसिंह धोनीची फिनिंग धमक कमी झाल्याचाही चेन्नईच्या संघाला कुठंतरी फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. यावर ते तोडगा कसा काढणार? ते पाहण्याजोगे असेल. शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांच्यातील धमक दिसल्याशिवाय हे चक्रव्यूव्ह भेदणं मुश्किल आहे. या सर्व अडचणीत ऋतुराज गायकवाड कसा मार्ग काढतोय ते पाहण्याजोगे असेल.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५चेन्नई सुपर किंग्सऋतुराज गायकवाडमहेंद्रसिंग धोनीरवींद्र जडेजापंजाब किंग्स