IPL 2025 KKR vs GT 39th Match Player to Watch Prasidh Krishna Gujarat Titans : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात नव्या प्रतिभावंत खेळाडूंनी मिळालेल्या संधीचं सोनं करत खास छाप सोडल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय काही जुने मोहरेही नव्या जोमानं यंदाचा हंगाम गाजवताना दिसून येते. आयपीएलच्या महासंग्रामात तेवर दाखवणे ही काही साधी सोपी गोष्ट नाही. संधीचं सोन करणाऱ्या खेळाडूच्या यशामागे वर्षांनुवर्षे केलेली मेहनत दडलेली असतेच. पण याशिवाय आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे त्या खेळाडूवर संघ अन् कोचिंग स्टाफनं दाखवलेला भरवसा. यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्सच्या ताफ्यातून दमदार पदार्पण करणारा प्रसिद्ध कृष्णावर नेहरानं भरवसा दाखवला अन् हा पठ्ठ्या आता दमदार कमबॅकसह मैदानात गाजवताना दिसतोय. इथं जाणून घेऊयात त्याच्या कमबॅकमागची खास स्टोरी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
KKR कडून पदार्पण RR च्या संघानं केलं 'करोडपती'
भारताचा जलदगती गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याने २०१८ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातून आयपीएलचा प्रवास सुरु केला. पदार्पणाच्या हंगामात ७ सामन्यात १० विकेट्स घेऊन तो लक्षवेधी ठरला. पहिल्या तीन हंगामात केकेआरकडून खेळताना गोलंदाजीतील धार दाखवल्यावर २० लाखाच्या गड्याला राजस्थानच्या संघानं १० कोटी मोजून आपल्या ताफ्यात सामील करून घेतल्याचे पाहायला मिळाले. २०२१ च्या हंगामात राजस्थानकडून खेळताना त्याला १० सामन्यात संधी मिळाली. यात त्याने १२ विकेट्स घेतल्या. २०२२ च्या हंगामात त्याने १७ सामन्यात १९ विकेट्स घेतल्या. मग त्याची टीम इंडियातही एन्ट्री झाली. पण दुखापतीमुळे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला एकदमच ब्रेक लागला.
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
IPL च्या दोन हंगामातून गायब होण्याची आली वेळ
जलदगती गोलंदाज म्हटलं की, दुखापती ग्रहण हे ठरलेले असते. या गोलंदाजालाही पाठीच्या दुखापतूमुळे क्रिकेटच्या मैदानापासून दूर रहावे लागले. आयपीएलच्या मागच्या दोन हंगामातून तो गायब झाला. जलदगती गोलंदाज दुखापतीतून सावरून पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला. आयपीएल मेगा लिलावात गुजरात टायटन्सच्या संघानं त्याच्यावर मोठा डाव खेळला. ९ कोटी ५० लाख रुपये मोजून गिलच्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात घेतले. हा निर्णय म्हणजे लंगड्या घोड्यावर डाव लावण्यातला प्रकार आहे, अशी चर्चाही रंगली. पण हा डाव एकदम परफेक्ट ठरला. कारण त्यामागचा चेहरा हा नेहराचा होता.
नेहरानं 'भरवसा' दाखवला अन् प्रसिद्ध कृष्णा पुन्हा प्रकाशझोतात आला
गुजरात टायटन्सच्या संघानं प्रसिद्ध कृष्णासाठी मोठी रक्कम मोजल्यावर अनेकांना आश्चर्य वाटले होते. कारण तो दुखापतीतून सावरून कमबॅक करणार होता. फलंदाजांच्या तुलनेत गोलंदाजांसाठी दुखापतीतून सावरून मैदानात धमक दाखवणे हे अधिक आव्हानात्मक असते. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत जवळपास १२ शस्त्रक्रिये झालेल्या नेहरानं प्रसिद्धी कृष्णावर भरवसा दाखवला. एवढेच नाही तर त्याच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीत अधिक धार आलीये. गती, यॉर्कर आणि बॅक ऑफ लेंथ चेंडूसह तो फलंदाजांसमोर मोठ आव्हान निर्माण करताना दिसतोय. पहिल्या ७ सामन्यात १४ विकेट्ससह तो पर्पल कॅपच्या शर्यतीत टॉपला जाऊन बसलाय. उर्वरित सामन्यात छाप सोडून तो पर्पल कॅपसह संघाला जेतेपद मिळवून देण्यात यशस्वी ठरणार का ते पाहण्याजोगे असेल.