ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील दुखापतीनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला मुकलेला जसप्रीत बुमराह आयपीएल पासूनही दूर आहे. तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात कधी दिसणार? हा प्रश्न आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यापासून चर्चेत आहे. आता बुमराहच्या फिटनेससंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जसप्रीत बुमराह आणखी दोन सामन्यांना मुकणार
ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, ४ एप्रिलला लखनौ विरुद्धच्या सामन्यासह जसप्रीत बुमराह ७ एप्रिलला आरसीबी विरुद्धच्या सामन्यालाही मुकणार आहे. कंबरेच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह सध्या बंगळुरुस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेस चाचणीच्या प्रक्रियेतून जात आहे. तो फिटनेस टेस्ट पास करून मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील होईल, अशी आशा आहे. बीसीसीआय मेडिकल टीमच्या परवानगी दिल्याशिवाय तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात जॉईन होऊ शकणार नाही.
IPL 2025 : मिस्टर IPL ची कार्बन कॉपी! MI च्या ताफ्यातील गडी रिव्हर्स स्वीप-स्कूप शॉट्सही मारतो भारी
आयपीएलमध्ये बुमराहच्या नावे आहेत १६५ विकेट्स
आयपीएलच्या यंदाच्या हंगामता मुंबई इंडियन्सची सुरुवातच खराब झालीये. पहिल्या दोन सामन्यात पराभवानंतर संघाने तिसऱ्या सामन्यात पहिला विजय मिळवला. बुमराह हा संघाची मोठी ताकद आहे. पण आता आणखी दोन सामने बुमराहशिवाय खेळावे लागणार असल्यामुळे मुंबई इंडियन्स संघाला हा मोठा धक्काच आहे. आयपीएलमध्ये जसप्रीत बुमराहनं आतापर्यंत १६५ घेतल्या आहेत.
बुमराहच्या अनुपस्थितीत MI नं खेळलाय नव्या मोहऱ्यांवर डाव
जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत ट्रेंट बोल्ट आणि दीपक चाहर हे अनुभवी गोलंदाज संघाकडून मैदानात उतरताना दिसते. याशिवाय विग्नेश पुथुर आणि अश्वनी कुमार या युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळाली आहे. अनुभवी गोलंदाजांच्या तुलनेत या दोघांनी खास छाप सोडल्याचे पाहायला मिळाले आहे.