Join us

रात्री १० वाजता झोपला, डाएटवर लक्ष दिलं तर सगळं ठिक होईल! प्रितीच्या 'हिरो'चा पृथ्वीला सल्ला

मित्राच्या क्षमतेवर भरवसा, फक्त काही बेसिक सवयी अंगीकाराव्या असा दिल्ला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 13:41 IST

Open in App

आयपीएलच्या मैदानात धमाकेदार कामगिरीसह अनेक युवा क्रिकेटपटूंनी टीम इंडियात एन्ट्री मारलीये. पण एक असा खेळाडूही आहे  त्याला टीम इंडियात सोडाच पण यंदाच्या आयपीएलमध्ये कुणी भाव दिलेला नाही. तो खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे पृथ्वी शॉ. गेल्या काही वर्षांत पृथ्वी शॉ मैदानातील कामगिरीशिवाय मैदानाबाहेरील गोष्टींमुळेच चर्चेत आहे.  या गोष्टींचा मोठा फटकाही त्याला बसला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पृथ्वीनं किंमत कमी केली तरी अनसोल्ड; आता प्रितीच्या 'हिरो'नं दिला सल्ला

तो आपली किंमत कमी करून फक्त ७५ लाखासह त्याने मेगा लिलावात नाव नोंदणी केली होती. पण कोणत्याही फ्रँचायझीनं त्याला आपल्या ताफ्यात घेण्याचं धाडस दाखवलं नाही. गत हंगामापर्यंत तो दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. पण क्षमता असूनही आता वाया गेलेला खेळाडूंच्या यादीत त्याचं नाव गेले आहे. या खेळाडूला आता आयपीएलमधील प्रिती झिंटाच्या ताफ्यातील हिरो शशांक सिंह याने मोलाचा सल्ला दिलाय.  

पृथ्वी शॉची थेट शुबमन गिल अन् यशस्वीसोबत तुलना

पंजाब किंग्सच्या ताफ्यातील शशांक सिंह हा पृथ्वी शॉ सोबत खेळला आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मैदानात उतरण्याआधी शशांक सिंहनं  एका पॉडकास्टमध्ये गप्पा गोष्टी करताना पृथ्वी शॉची तुलना यशस्वी जैसवाल आणि शुबमन गिल यांच्यासोत केलीये. पृथ्वी हा तगडा सलामीवीर होण्याची क्षमता असणारा खेळाडू आहे, असे मतही त्याने मांडले.  

पृथ्वीबद्दल नेमकं काय म्हणाला शशांक सिंह

पृथ्वी शॉला आतापर्यंत खास ओळख निर्माण करता आलेली नाही. पण त्याने बेसिक गोष्टीवर  लक्ष दिले तर या गोष्टी तो अगदी सहज करू शकतो. मी त्याला वयाच्या १३ व्या वर्षांपासून ओळखतो. मुंबई क्रिकेट क्लबमध्ये त्याच्यासोबतच खेळलोय. त्याच्यासोबत सध्या जे घडतंय ते बदलायचे असेल तर त्याला स्वत:मध्ये काही बदल करावे लागतील. रात्री ११ ऐवजी त्याने १० वाजता झोपण्याची सवय लावली आणि डाएटवर लक्ष दिले तर त्याचा क्रिकेटचा आलेख उंचावण्यास निश्चितच मदत मिळेल, असे म्हणत शशांकनं पृथ्वी शॉला पुन्हा ट्रॅकव येण्यासाठी मोलाचा सल्ला दिला आहे.

शशांक सिंह पंजाबच्या ताफ्यातील हिरो

२०२४ च्या हंगामात शशांक सिंहच्या नावावरुन चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. प्रिती झिंटानं ज्या शशांकसाठी पॅडल उचलले तो हा नव्हेच असा गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर पंजाबच्या संघानं आम्हाला हव्या असणाऱ्या खेळाडूवरच डाव खेळल्याचेही स्पष्टीकरण दिले होते. या शशांक सिहंनं गत हंगामात धमाकेदार कामगिरी करताना ३५४ धावा केल्या. तो प्रितीच्या संघासाठी नव्या हिरोच्या रुपात संघात आहे. मेगा लिलावाआधी पंजाब फ्रँचायझी संघाने ५.५ कोटी रुपयांसह त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. 

टॅग्स :पृथ्वी शॉइंडियन प्रिमियर लीग २०२५प्रीती झिंटादिल्ली कॅपिटल्सपंजाब किंग्स