IPL 2025 : 'हाऊ इज द जोश'... मुंबई इंडिन्सला नडला इंग्लिस; फिफ्टीसह एका डावात ४ रेकॉर्ड्सचा पराक्रम

आठ वर्षांपासूनचा दुष्काळ अन् बरंच काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 00:36 IST2025-05-27T00:33:51+5:302025-05-27T00:36:16+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025: How is Josh! Mumbai Indians defeated; 4 records in an innings including a fifty | IPL 2025 : 'हाऊ इज द जोश'... मुंबई इंडिन्सला नडला इंग्लिस; फिफ्टीसह एका डावात ४ रेकॉर्ड्सचा पराक्रम

IPL 2025 : 'हाऊ इज द जोश'... मुंबई इंडिन्सला नडला इंग्लिस; फिफ्टीसह एका डावात ४ रेकॉर्ड्सचा पराक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या टॉप २ च्या लढाईत पंजाब किंग्जच्या ताफ्यातून जॉश इंग्लिस याने टॉप क्लास खेळी केली. या सामन्यातील ७३ धावांच्या खेळीसह तो पंजाबच्या संघासाठी हिरो ठरला. एवढेच नाही तर या दमदार अर्धशतकासह ऑस्ट्रेलियन बॅटरनं एका डावात  ४ मोठ्या विक्रमांना गवसणी घातली. इथं एक नजर टाकुयात मुंबई इंडियन्सच्या तगड्या गोलंदाजांसमोर जोश दाखवत त्याने सेट केलेल्या विक्रमांवर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

पंजाबकडून अर्धशतक झळकावणारा पहिला परदेशी बॅटर ठरला इंग्लिस

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पंजाबच्या संघाला आतापर्यंत कर्णधार श्रेयस अय्यरसह भारतीय अनकॅप्ड बॅटर्संनी तारल्याचे पाहायला मिळाले होते. ज्या परेदशी खेळाडूंवर भरवसा दाखवला ते अपयशी ठरले. पण जॉश इंग्लिस याने मिळालेल्या संधीच सोन करत आपल्यातील क्लास दाखवला. तो यंदाच्या हंगामात पंजाबकडून अर्धशतक ठोकणारा पहिला परदेशी बॅटर ठरला. 

MI नं मोठी संधी गमावली अन् ते Eliminator मध्ये फसले! PBKS ठरला Qualifier 1 मधील पहिला संघ

पंजाबच्या संघाकडून ८ वर्षांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दाखवला जलवा 

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या अर्धशतकासह जॉश इंग्लिस याने ८ वर्षांचा मोठा दुष्काळही संपवला. याआधी २०१७ च्या हंगामात शॉन मार्श या ऑस्ट्रेलियन बॅटरनं पंजाबकडून खेळताना गुजरात लायन्स विरुद्ध शेवटचे अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर एकाही ऑस्ट्रेलियन संघाला ही किमया साधता आली नव्हती. फेल ठरलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या यादीत मॅक्सेवलचाही समावेश आहे. अखेर जॉश इंग्लिसनं अर्धशतकी डाव साधत हा दुष्काळ संपवला.

IPL मध्ये अर्धशतक झळकवणार दुसरा ऑस्ट्रेलियन विकेट किपर बॅटर

 
जॉश इंग्लिस हा आयपीएलमध्ये अर्धशतक साजरे करणारा दुसरा ऑस्ट्रेलियन विकेट किपर बॅटर आहे. याआधी ॲडम गिलख्रिस्ट याने हा पराक्रम करून दाखवला आहे. त्याच्या नावे आयपीएलमध्ये १३ अर्धशतकांची नोंद आहे. याशिवाय जॉश इंग्लिस हा पंजाबकडून अर्धशतकी खेळी करणारा तिसरा विकेट किपर बॅटर आहे. गिलख्रिस्टशिवाय संगकाराने पंजाबकडून ही कामगिरी केली आहे.
 

Web Title: IPL 2025: How is Josh! Mumbai Indians defeated; 4 records in an innings including a fifty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.